सध्या दशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अनेकजण देवीची मनोभावनेने पूजा करत तिच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देत असतात. देशात देवीची अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला देवीच्या अशाच एका अनोख्या आणि चमत्काराविषयी माहिती सांगत आहोत. मोक्ष देण्यासाठी आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे देवीचे मंदिर फार प्रचलित आहे. इथे नवरात्रीत अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवी दुर्गामातेच्या स्कंदमाता रूपाची या मंदिरात पूजा केली जाते. हे मंदिर नक्की कुठे आहे आणि मंदिराचा इतिहास याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
वाराणसीच्या जगतपूरा भागात असलेल्या देवी मातेच्या संकुलात स्कंदमाता देवीचे मंदिर आहे. या मंदिरात नेहमीच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, काशीखंड आणि देवी पुराणात या देवीच्या रूपाचा उल्लेख करण्यात आला आहे. नवरात्रीच्या दिवसांत तुम्ही या मंदिराला भेट देऊन देवीकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करू शकता. गर्दीमुळे या दिवसांत येथे पोलीस प्रशासनही पूर्ण सतर्कतेने तैनात असतात.
हेदेखील वाचा – Navratri Travel: कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, इथे पिंडीच्या रूपात आहे देवी विराजमान
धार्मिक कथेनुसार, एकदा देवासूर नावाच्या राक्षसाने वाराणसीमध्ये संत आणि इतर सामान्य लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देवी स्कंदमातेने या राक्षसाचा नाश केला. या घटनेनंतर येथे माता स्कंदमातेची पूजा केली जाऊ लागली. येथे देवी निवास करते आणि काशीचे वाईट शक्तींपासून संरक्षण करते अशी भाविकांची मान्यता आहे.
हेदेखील वाचा – Navratri Travel: भारतातील एकमेव मंदिर जिथे आहेत देवीची नऊ रूपं, इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध