नवरात्रीचा उत्सव आता देशभरात सुरु झाला असून लोक मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात हा सॅन साजरा करत आहेत. या सणादरम्यान, अनेकजण देवीच्या वेगवगेळ्या मंदिरांना भेट देत पूजा-अर्चा करतात. देशात देवीची अनेक अद्भुत मंदिर आहेत, जिथे केवळ दर्शनाने भाविकांच्या सर्व अडचणी दूर होतात. असे म्हणतात की, नवरात्रीच्या दिवसांत देवीच्या मंदिरांना आवर्जून भेट द्यावी. असे केल्याने भक्तांच्या मानोइच्छा पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला देवीच्या एका अनोख्या मंदिराविषयी माहिती सांगत आहोत. इथे भगवान गणेश या मंदिराचे पहारेकरी आहेत. चला तर या मंदिराविषयी काही रंजक बाबी जाणून घेऊयात.
आम्ही तुमच्या ज्या मंदिराविषयी सांगत आहोत ते मंदिर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे देवी विंध्यवासिनी विंध्याचलच्या नावाने प्रचलित आहे. नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. असे म्हणतात की, या जागी भगवान श्रीरामांनी पश्चिमेकडे शिवाची मूर्ती स्थापित केली होती. त्यामुळे हे ठिकाण रामेश्वर नावानेही प्रसिद्ध झाले आणि हे ठिकाण शिवपुरी म्हणून ओळखले जाते.
हेदेखील वाचा – Navratri Travel: देवी स्कंदमातेचं चमत्कारी मंदिर, इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रसिद्ध
जर तुम्ही विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात जात असाल तर तुम्हाला इथे सर्वात आधी भगवान गणेशाचे दर्शन घ्यावे लागेल. विंध्यवासिनी देवीचे दर्शन याशिवाय अपूर्ण मानले जाते. प्रथम मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घ्या आणि मग विंध्यवासिनी देवीची पूजा करा. असे केल्याने भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
हेदेखील वाचा – Navratri Travel: कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, इथे पिंडीच्या रूपात आहे देवी विराजमान
देवी विंध्यवासिनीचे मंदिर महाकाया आणि योगमायेच्या नावानेही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, कंसाला जिने मारण्याचा प्रयत्न केला ती देवी विंध्यवासिनी होती. त्याला मारण्यापूर्वीच तिने त्याच्या मृत्यची भविष्यवाणी केली होती. असे म्हणतात की, महामारीच्या वेळेस देवी विंध्यवासिनीची पूजा केल्याने संकटं टळली जातात. नवरात्रीत एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्या.