फोटो सौजन्य: iStock
नवीन वर्षाची सुरुवात होण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मोठ्या उत्साहाने तयारी करत असतात. भारतात नववर्ष साजरा करण्यासाठी गोवा हे सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. परंतु, यंदा जर तुम्ही परदेशात नववर्ष साजरे करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही उत्कृष्ट, बजेट-फ्रेंडली आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सबद्दल सांगणा आहोत. या ठिकाणी तुम्ही कुटुंब, मित्रपरिवार किंवा जोडीदारासोबत जाऊ शकता आणि हा अनुभव अविस्मरणीय ठरवू शकता.
ही आहेत बजेट फ्रेंडली परदेशी ठिकाणे
थायलंड
थायलंड हा भारतीय पर्यटकांचा सर्वात आवडता देश आहे. कमी बजेटमध्ये अप्रतिम समुद्रकिनारे, नाइट लाइफ आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेण्यासाठी थायलंड हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथील पट्टाया आणि फुकेट ही ठिकाणे खूप किफायतशीर आहेत. नववर्षाच्या काळात थायलंड पर्यटकांनी गजबजलेला असतो. तुमच्यासाठी 2025 च्या नववर्ष साजरे करण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्र, परिवारासोबत थांयलंडला भेट देऊ शकता.
फोटो सौजन्य: iStock
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ शहराला ‘Paris Of India’ म्हणून ओळखले जाते, जाणून घ्या काय आहे खास?
इंडोनेशिया (बाली)
इंडोनेशिया, बाली हे जगातील सर्वात सुंदर आयलंड्सपैकी एक मानले जाते. कपल्समध्ये हनीमूनसाठी प्रसिद्ध असलेले बाली एक बजेट-फ्रेंडली ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे आणि वॉटर स्पोर्ट्स नववर्ष साजरे करण्यासाठी परिपूर्ण आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नवीन वर्षाचा प्लॅन करत असाल तर बालीचा नक्की विचार करा. यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस स्मरणिय बनवा.
फोटो सौजन्य: iStock
भूतान
वीजा फ्री देश शोधत असाल, तर भूतान हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. भारताजवळच असलेला भूतान शांत आणि नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. ‘हॅपीनेस कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूतानमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत नववर्ष साजरे करणे तुमच्या बजेटमध्ये होईल.
फोटो सौजन्य: iStock
मलेशिया
भारतीय पर्यटकांमध्ये मलेशियाचा समावेश नेहमीच असतो. मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आणि सांस्कृतिक वारसा असलेले कुआलालंपूर हे मुख्य आकर्षण आहे. पेट्रोनास टॉवर्स, चायना टाउन आणि लंगकावी आयलंड ही ठिकाणे नववर्ष साजरे करण्यासाठी आदर्श आहेत.
फोटो सौजन्य: iStock
बजेटमध्ये ट्रिप कशी प्लॅन कराल?
या गोष्टी लक्षात ठेवून नववर्षाची सुरुवात परदेशातील अप्रतिम ठिकाणी आनंदाने साजरी करा.