भारताच्या सर्वोत्तम ट्रेन्समध्ये वंदे भारतचा मुख्यतः समावेश होतो. 2019 साली वंदे भारत ट्रेन प्रथम सुरु करण्यात आली. तेव्हापासून ही ट्रेन अनेक भारतीयांची आवडती ट्रेन बनली. या ट्रेनची खासियत म्हणजे जुन्या गाड्यांपेक्षा या ट्रेनने लांबचा प्रवास सुरळीत आणि कमी वेळेत कापता येतो. वंदे भारत ट्रेन जुन्या गाड्यांपेक्ष वेगवान गतीने चालते आणि लांबचा प्रवास अधिक सुख-कर करते. तसेच या ट्रेनमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध असतात. यात प्रवाशांना फ्री वाय-फाय, मनोरंजनासाठी 32-इंच मोठी स्क्रीन आणि रुंद काचेच्या खिडक्या अशी वैशिष्ट्ये पुरवली जातात.
याचाच अर्थ तुम्ही या ट्रेनमध्ये इंटरनेट चालवू शकता आणि प्रवास करताना सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. मात्र आता वंदे भारत किती मार्गांनी धावत आहे तुम्हाला माहित आहे का? आतापर्यंत वंदे भारत ट्रेन एकूण 40 हुन अधिक मार्गांनी धावते. असे म्हणतात की, वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीटाची किंमत फार मोठी आकारवी लागते मात्र आम्ही तुम्हाला आज वंदे भारतच्या 5 खास ट्रेनविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. विशेष म्हणजे, या ट्रेन्सच्या तिकीटाची किंमत अगदी कमी असून 1000 हून कमी तुम्हाला या ट्रेनचे तिकीट मिळणार आहे.