पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत अनेकजण आपल्या कुटुंबासह किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर फिरण्याचा प्लॅन करत असतात. या ऋतूत अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. अशात या ऋतूत पर्यटकांची संख्या फार वाढते. भारतात असे अनेक ठिकाण आहेत, जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. तुम्हीही या ऋतूत कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जे स्वर्गापेक्षा कमी नाही. इथे तुम्हाला स्वर्गाचा भास झाल्यासारखे वाटेल.
सिक्कीमच्या सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले खेचोपलरी सरोवर त्याच्या रहस्यमय आणि विलोभनीय सौंदर्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. या तलावाला इच्छापूर्ती तलाव असेही म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, या तलावात कोणतीही इच्छा मागितली किंवा केली तर ती पूर्ण होते, अशी मान्यता आहे.
सिक्कीममध्ये स्थित खेचोपलरी तलावाला ‘इच्छापूर्ती तलाव’ असे म्हटले जाते. या तलावात दुरदुरून लोक आपल्या इच्छापूर्तीसाठी येत असतात. हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तलावांपैकी एक मानले जाते. खेचोपलरी गावात पोहोचताच तुम्हाला तलाव दिसेल.
हेदेखील वाचा –पाकिस्तानातील 2 प्राचीन शिवमंदिराची कहाणी! 3,000 वर्षांहून अधिक जुने शिवलिंग, इथे शिवाच्या अश्रूचा थेंब पडला होता
तुम्ही येथे मनन मंदिर किंवा नामग्यांग स्तूपालाही भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या जवळच्या विमानतळावरून गंगटोक विमानतळावर येऊ शकता. याशिवाय, तुम्ही जवळच्या रेल्वे स्टेशनवरून नया बाजार रेल्वे स्टेशनच्या मदतीने गंगटोकला पोहोचू शकता.
येथे गेल्यानंतर तुम्ही टॅक्सी, रिक्षा किंवा बसने खेचोपलरीला सहज पोहोचू शकता. इथे येण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळा. येथे आल्यानंतर तुम्ही तलावाव्यतिरिक्त गंगटोक रॉयल पॅलेस, बाबा मंगू भवन, त्सो ला लेक यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.