Pune News: भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री प्रकरणाबाबत आरोप केले जात आहेत. यासंबंधित शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. दरम्यान आज मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी एक ट्वीट केले आहे. यामुळे मोहोळ-धंगेकर वाद वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले मंत्री मुरलीधर मोहोळ?
या प्रकरणात माझा सहभाग नसल्याचे मी वारंवार स्पष्ट केले आहे. प्रत्येक धर्माचे गुरु असतात. ते सर्वांसाठी वंदनीय असतात. आज मी टयांचे दर्शन घेण्यासाठी येथे आलो होतो. मी दोषी असतो तर इथे आलोच नसतो. या प्रकरणात योग्य न्याय होईल. लोकप्रतिनिधी, खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलेले आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी एक पोस्ट करत नवीन बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण आणखीनच तापले आहे. रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहुयात.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर? |
” एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा” अशी कानउघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे मोहोळ आज तातडीने जैन मुनींच्या पायी नतमस्तक झाले. तब्बल १८ दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली. मुळात कुंपणाने शेत खाल्ल्यामुळे न्यायनिवडा कोणी करायचा…? हा प्रश्न आहे. स्वतःच्याच कंपनीला फायदा होईल यासाठी ही जागा घेतल्याने आता कुठल्या तोंडाने मी व्यवहार रद्द करतो, असं सांगू अशी अवस्था त्यांची झालेली आहे. परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देवो…. जैन मंदिराची बळकवलेली जागा ते लवकरात लवकर परत करो….!
Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”
मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात धंगेकरांवर पक्षाकडून कारवाई होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, “रवींद्र धंगेकरांना काय निरोप द्यायचा तो मी पाठवला आहे. महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.






