 
        
        ब्रिटनने पाकिस्तानच्या एअरलाइन्सवरील बंदी हटवली; इस्लामाबादहून मॅंचेस्टरला पाच वर्षानंतर पहिले उड्डाण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan UK Relations : इस्लामाबाद/लंडन : एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) इंटरनॅशनल एअरलाइन्सने (PIA) शनिवारी (२५ ऑक्टोबर) युकेला जाणारी उड्डाणे पुन्हा एकदा सुरु केली आहे. पाच वर्षांसाठी यावर बंदी घालण्यात आली होती. पण आता ही बंदी उठवण्याचत आली असून इस्लामाबादहून मॅंचेस्टरला PIA एअरलाइन्सने २८४ प्रवाशांसह उड्डाण घेतले आहे.
पाकिस्तानच्या PIA एअरलाइन्सने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, जुलै २०२० नंतर इस्लामाबादहून मॅंचेस्टरला जाणारी पहिली विमान सेवा सुरु झाली असून २८४ प्रवाशांसह उड्डाणे केली आहे. या विमानात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी देखील प्रवास केला.
युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ESSA) आणि यूके सिव्हिल अथॉरिटीने २०२० मध्ये यावर बंदी घालती होती. कारचीमध्ये २०२० मध्ये एक विमान अपघात झाला होता. या अपघात जवळपास १०० प्रवाशांच्या मृत्यू झाला होते. तसेच तत्कालीन विमान वाहतूक मंत्री गुलाम खान यांनी पाकिस्तानी वैमानिकांनी बनावट परवाने वापरल्याचे उघड केले होते. यानंतरच पाकिस्तान PIA एअरलाइलन्सवर युकेने बंदी घातली होती.
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये ही बंदी ESSA ने उठवली, तर यंदा जुलैमध्ये ब्रिटनने पाकिस्तानला त्यांच्या हवाई सुरक्षा यादीतून काढू टाकले. यामुळे पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना ब्रिटनला जाणाऱ्या उड्डाणांसाठी परवाना मिळाला.
दरम्यान बंदी उठवल्यानंतर विमान रवाना होण्यापूर्वी इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर याचा आनंद साजर करण्यात आला. एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात संरक्षण मंत्रालय, राजनैतिक मिशन आणि विमान वाहतूकीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी या निर्णयामुळे भारत आणि ब्रिटनचे संबंध अधिक मजबूत होतील असेही म्हटले. पाकिस्तान एअरलाइन्स आता हळूहळू लंडन, बर्मिंगहॅममधूनही उड्डाणे सुरु करण्याची योजना आखत आहे. येत्या दोन आठवड्यावर यावर कार्य सुरु होईल असे सांगितले जात आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. पाकिस्तानने कोणत्या देशात विमान उड्डाणे सुरु केली?
पाकिस्तानने इस्लामाबादहून ब्रिटनच्या मॅंचेस्टरला जाणारी विमान उड्डाणे सुरु केली.
प्रश्न २. पाकिस्तानच्या एअरलाइन्सवर किती काळ व का घालण्यात आली होती बंदी?
२०२० मध्ये कराचीमध्ये एक भीषण विमान अपघात झाला होता. या अपघातात १०० प्रवाशांच्या मृत्यू झाला होता. तसेच तत्कालीन विमान वाहतूक मंत्री गुलाम खान यांनी पाकिस्तानी वैमानिकांनी बनावट परवाने वापरल्याचे उघड केले होते, यामुळे पाकिस्तानच्या एअरलाइन्सवर बंदी घालण्यात आली होती.
प्रश्न ३. कोणी घातली होती पाकिस्तानच्या एअरलाइन्सवर बंदी?
युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (ESSA) आणि यूके सिव्हिल अथॉरिटीने पाकिस्तानच्या एअरलाइन्सवर बंदी घातली होती.
रशिया युक्रेन तणाव शिगेला! कीववर मॉस्कोचा बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा ; ४ ठार अन्…






