एचएमपीव्ही व्हायरस बाबत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. एचएमपीव्ही हा व्हायरस नवीन नसून जुना आहे याबाबत चिंता करण्याची फारशी गरज नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, डायबिटीक, हायपर टेन्शन असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी, ताप, खोकला ही या व्हायरसची लक्षणे आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे व सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. या संदर्भात महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभाग काम करत आहे. या व्हायरस संदर्भात कुठलेही लक्षणं आढळून आल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन नागरिकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जनतेने घाबरु नये काळजी घ्यावी व काही समस्या असल्यास आरोग्य विभागाच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.