बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातून दोन वर्षासाठी जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार करण्याची नोटीस दिली गेली आहे,याचपार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुपकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या चळवळीत ज्ञानेश्वर टाले अनेक वर्षांपासून माझ्यासोबत ताकदीने काम करतात. माझ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघात अतिशय ताकदीने माझ्या प्रचाराची व नियोजनाची धुरा सांभाळली होती. विद्यमान खासदारांच्या तोडीस तोड मते मला मेहकर विधानसभेत पडली, हे त्यांच्या व सहकाऱ्यांच्या परिश्रमांचे फलित आहे. डॉ. टाले यांच्यावर चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल नसून केवळ चळवळीच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे दाखल आहेत. अनेक वेळा खोटे गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दाखल केले आहेत. त्यात अतिरेक असा की ऑक्टोबर महिन्यातील नोटीस त्यांना पोलिसांनी काल दिली आहे, जेणेकरून त्यांना बाजू मांडण्यास वेळ मिळायला नको.मात्र माझ्या सहकाऱ्यांना अशा कितीही नोटीसा दिल्या तरी आम्ही त्याला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला तडीपार करा नाहीतर फासावर लटकवा, आमची सत्याची लढाई थांबणार नाही. महाराष्ट्राची पूर्ण संघटना व आम्ही डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. असा पाठींबा तुपकरांनी ज्ञानेश्वर टाले यांना दिला आहे.