लातुर जिल्ह्यातल्या औसा आणि भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडण्यात यश मिळवलं आहे. त्यातील कांही आरोपी फरार झाले होते, त्यानंतर त्या आरोपीकडून शश्त्र साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानुसार सर्व गुन्हेगारांची चौकशी केली असता सहावा आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागला असून त्या आरोपी कडून मोठया प्रमाणात गुटखा व ईतर साहित्य जप्त करण्यात आलंय. अजूनही या सर्व आरोपीची चौकशी सुरु असून या टोळीने लातुर जिल्ह्यात नऊ ठिकाणी दरोडे व चोरी केल्याचं उघड झालंय. यानुसार या आरोपीनी लातुरसह बीड, धाराशिव व बिदर मध्ये देखील चोऱ्या केल्याचं समोर आलं असून अजूनही तपास सुरु असल्याचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी सांगितलंय, तसेच या टोळीला पकडण्याच्या कामगिरीत सहभागी असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार असून या कामगिरीत सहभागी असलेल्या नागरिकांचा देखील बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी सांगितलं आहे .