नाशिक : गंगापूर गावात एका घरातून गांजा विक्री करणाऱ्या युवकास गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ५ किलो ८०५ ग्रॅम गांजासदृश्य अंमली पदार्थ, चिलीम व प्लॉस्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अनिल गुंजाळ (वय ३७, रा. पेठ गल्ली, गंगापूर गाव, नाशिक) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.गंगापूर पोलीस ठाण्ण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार आणि खंडणी विरोधी पथकातील अंमलदारांना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.अंमलदार तुळशीदास चौधरी यांना पेट्रोलिंग करत असताना संशयित अनिल गुंजाळ हा घरात गांजासदृश्य अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. पोलिसांनी संशयित अनिल गुंजाळ यास अटक केली.