फोटो सौजन्य: @anoopxh/X.com
भारतीय बाजारात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बाईक ऑफर करत आहेत. मागील काही वर्षांपासून ॲडव्हेंचर बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत, काही कंपन्यांनी उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या ॲडव्हेंचर बाईक लाँच केल्या आहेत. नुकतेच TVS ने त्यांची पहिली वाहिली ॲडव्हेंचर बाईक लाँच केली आहे.
भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर्सने अखेर त्यांची पहिली ॲडव्हेंचर बाईक, Apache RTX 300 लाँच केली आहे. ही बाईक 1.99 लाख (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की हे मॉडेल ॲडव्हेंचर आणि आरामाचे परिपूर्ण कॉम्बिनेश आहे. आता ही बाईक Royal Enfield Scram 440, KTM 250 Adventure आणि Yezdi Adventure सारख्या बाईकशी थेट स्पर्धा करेल. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवीन टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 कंपनीच्या नवीन RT-XD4 इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. या बाईकमध्ये 299.1 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड डीओएचसी इंजिन आहे जे 9,000 आरपीएमवर 36PS पॉवर आणि 7000 आरपीएमवर 28.5Nm एनएम टॉर्क निर्माण करते.
हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-अँड-स्लिपर क्लचसह जोडलेले आहे. या बाईकमध्ये रायडरला चार राइड मोड्स – Urban, Rain, Tour आणि Rally दिले आहेत.
वाहन खरेदीदारांची Diwali 2025 गोड होणार! Yamaha कडून ‘या’ दुचाकींवर दमदार डिस्काउंट ऑफर
Apache RTX 300 मध्ये इनव्हर्टेड कार्ट्रिज फोर्क (समोर) आणि सुधारित हँडलिंगसाठी मोनो-ट्यूब फ्लोटिंग पिस्टन (मागील) सस्पेंशन आहे. बाईकची हलकी स्टील ट्रेलिस फ्रेम ती मजबूत आणि संतुलित बनवते. कमी सीटची उंची आणि उत्कृष्ट पॉवर-टू-वेट रेशो शहरातील रस्त्यांपासून ते खडबडीत पर्वतीय पायवाटांपर्यंत सर्व रस्त्यावर सुरळीत हँडलिंग सुनिश्चित करते.
टीव्हीएस अपाचे RTX 300 ही पूर्णपणे रॅली-इन्स्पायर्ड बाईक आहे. याच्या डिझाइनमध्ये स्पोर्टी आणि ॲडव्हेंचरचा सुंदर कॉम्बिनेशन दिसून येतो. या बाईकमध्ये I-शेप LED हेडलॅम्प, LED इंडिकेटर्स, मस्क्युलर फ्युएल टँक, ट्रान्सपेरंट विंडस्क्रीन, आणि बीक-स्टाइल फ्रंट डिझाइन दिले आहे. हे सर्व एलिमेंट मिळून बाईकला एक दमदार आणि आकर्षक रॅली-लुक देतात.
कंपनीने ही बाईक पाच आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये सादर केली आहे – Pearl White, Viper Green, Lighting Black, Metallic Blue, आणि Tarn Bronze.
टीव्हीएसने या बाईकमध्ये तंत्रज्ञानाचा एक नवा स्टॅंडर्ड निर्माण केला आहे. फुल-कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, जो कॉल आणि SMS अलर्ट, GoPro कंट्रोल, आणि मॅप मिररिंग यांसारख्या स्मार्ट फिचर्सने सज्ज आहे.
सेफ्टी आणि राइड कंट्रोलसाठी बाईकमध्ये दमदार फीचर्स दिले गेले आहेत. जसे की ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम (दोन मोडसह) ABS मोड्स – Rally, Urban आणि Rain, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS), आणि क्रूझ कंट्रोल फिचर.