सध्या महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, पेट्रोल डिझेल, जीवनावश्यक वस्तू आदींची महागाई दिवसागणिक वाढत आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली महागाई तसेच ईडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मुंबईत ईडी कार्यालयाजवळील पेट्रोलपंपा जवळ हे आंदोलन करण्यात आले.