पार्लरला जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्यासाठी स्वयपांक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण वारंवार महागड्या ट्रीटमेंट किंवा स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारत नाहीत. वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, चुकीची जीवनशैली, चेहऱ्यावर केलेला जाणारा मेकअप, तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतात. चेहऱ्यावर पिंपल्स, मोठे फोड, मुरूम किंवा स्किन इन्फेक्शन झाल्यानंतर त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. हागडे फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट्स चेहऱ्यावर काहीकाळ प्रभावी टिकवून ठेवतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
पार्लरमध्ये जाऊन महागड्या स्किन ट्रीटमेंट करण्याऐवजी त्वचेवरील नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. स्वयंपाक घरातील पदार्थ त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला पिंपल्स आणि ऍक्ने कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या वापरामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल.
भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे मसाले उपलब्ध असतात. मसाल्यांमधील दालचिनी आणि तमालपत्र त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर वाढलेले मुरूम आणि पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी दालचिनी आणि तमालपत्राचा वापर करावा. दालचिनी आणि तमालपत्राचा फेसपॅक नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा दालचिनी तमालपत्र फेसपॅक चेहऱ्यावर लावावा.
Myopia विषयीचे सर्वसामान्य गैरसमज, वेळीच करा दूर; काय आहे सत्य
वाटीमध्ये एक चमचा दालचिनी पावडर, तमालपत्र पावडर, मध, लिंबाचा रस आणि कच्चे दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर मान आणि चेहऱ्यावर फेसपॅक लावून १५ मिनिट तसाच ठेवा. हलक्या हाताने त्वचेवर मसाज करत चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होतील.