प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (फोटो- सोशल मीडिया)
जन आरोग्य योजनेत 30 विशेष उपचार श्रेण्या उपलब्ध
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची महत्त्वाची योजना
5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा
पुणे: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची महत्त्वाची आरोग्य विमा योजना (Health News)आहे. या योजनेद्वारे गरीब आणि गरजू कुटुंबांना दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा दिली जाते, ज्यामुळे देशभरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार मिळू शकतात. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत पुणे (Pune News) जिल्ह्यातील 80,423 नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभार्थी कुटुंबांना आतापर्यंत 209 कोटी 29 लाख 50 हजार 115 रुपयांची मदत मिळाली आहे. महाराष्ट्रात ही योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत संयुक्तरीत्या राबविली जाते. यामध्ये पिवळे, केशरी रेशनकार्डधारक आणि इतर पात्र घटक यांचा समावेश आहे. या माध्यमातून लाखो कुटुंबांना आरोग्य सुरक्षेची हमी मिळते.
पुणे जिल्ह्यातही हजारो रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेषतः गरीब कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हवेली तालुक्याने सर्वाधिक लाभ घेतला असून 16,987 रुग्णांना एकूण 43 कोटी 91 लाख 26 हजार 320 रुपयांची मदत मिळाली आहे. सर्वात कमी लाभ वेल्हे तालुक्यात झाला असून 776 रुग्णांना 1 कोटी 83 लाख 82 हजार 300 रुपयांची मदत मिळाली आहे.
योजनेत 30 विशेष उपचार श्रेण्या उपलब्ध
सामान्य शस्त्रक्रिया, ईएनटी शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टरोलॉजी शस्त्रक्रिया, हृदयरोग उपचार व शस्त्रक्रिया, बाल शल्यक्रिया, यूरोलॉजी, न्यूरोशस्त्रक्रिया, सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, भाजलेल्या रुग्णांचे उपचार, पॉली ट्रॉमा, कृत्रिम अवयव, क्रिटिकल केअर, सामान्य औषधोपचार, संसर्गजन्य रोग, बालरोग, कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, पल्मोनोलॉजी, त्वचारोग, संधिवात, एंडोक्राइनोलॉजी, गॅस्ट्रोएन्टरोलॉजी आणि इंटरव्हेन्शनल रेडियोलॉजी.
Health Care : शांत झोप काळोखातच का लागते ? काय आहे यामागील शास्त्रीय कारण
तालुका निहाय आकडे
तालुका रुग्ण संख्या प्राप्त रक्कम
आंबेगाव 2,934 7,56,77,855
बारामती 4,837 13,69,26,690
भोर 2,195 6,11,98,960
दौंड 4,083 10,90,66,845
हवेली 16,987 43,91,26,320
इंदापूर 4,484 13,33,01,010
जुन्नर 5,945 16,36,10,190
खेड 3,812 8,90,23,250
मावळ 4,685 11,30,25,730
मुळशी 2,394 5,57,60,900
पुणे शहर 20,719 52,43,11,290
पुरंदर 2,785 7,38,25,370
शिरूर 3,787 9,98,13,405
वेल्हे 776 1,83,82,300
एकूण 80,423 2,09,29,50,115
“आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाद्वारे सरकारकडून विविध आजारांवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. याचे काटेकोर पालन केले जाते. पात्र नागरिकांनी लवकरात लवकर आपले आयुष्मान कार्ड तयार करून योजनांचा लाभ घ्यावा.”
– वैभव गायकवाड, विभागीय व्यवस्थापक, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पुणे विभाग






