येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे त्याची तयारी देखील जोरदार सुरू आहे. संघटनात्मक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकांमध्ये युती संदर्भात वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील पण निर्णय घेताना स्थानिक ठिकाणी परिस्थिती काय आहे याचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. आम्ही संघटनात्मक बांधणी करत आहोत आमची पूर्ण तयारी झालेली आहे असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.