सौजन्य - नवराष्ट्र टीम
स्वच्छतेदरम्यान टाक्यांमधील कचरा, पालापाचोळा, दगड, माती, शेवाळे काढून संपूर्ण टाकी स्वच्छ केली जाते. त्यानंतर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते. मोफत सुरू असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. राजेश बंगला, नकुल अपार्टमेंट, वीर नेताजी सोसायटी, दख्खन पाटबंधारे गृह रचना सोसायटी, अशोक सोसायटी, चंद्रलोक अपार्टमेंट यांसह परिसरातील अनेक सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि बंगल्यांतील टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
पीएमसी कॉलनी, पांडवनगर येथील मयूर शेंडगे म्हणाले, “आमच्या येथील दहा इमारतींच्या पाण्याच्या टाक्या साळेगावकर यांच्या वतीने स्वच्छ करण्यात आल्या. लोकहिताची कामे त्यांच्याकडून नेहमीच केली जातात.”
पीएमसी कॉलनी येथे या स्वच्छता मोहिमेच्या दूसऱ्या टप्प्यातील भूमिपूजन समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार शिरोळे म्हणाले, “स्वच्छ पाणी आणि निरोगी आरोग्य या उद्दिष्टाने राबविण्यात येणारी ही मोफत स्वच्छता मोहीम नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल आणि हा जनकल्याणकारी उपक्रम आहे.”
आयोजक साळेगावकर म्हणाले, “पावसाळ्यात अनेक टाक्या अस्वच्छ होतात. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. दिवसेंदिवस सोसायट्यांचा सहभाग वाढत आहे.”
भूमिपूजनप्रसंगी हेमंत डाबी, किरण ओरसे, सुजीत गोटेकर, पाटोळे, रविराज यादव, अपर्णा कुऱ्हाडे, लता धायगुडे, सीमा उत्तेकर, दत्ता घोगल्लू, ईश्वर बनपट्टे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






