माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात गंगाखेड शहराच्या विकासासाठी साडेअकराशे कोटींचा निधी मी आणला आहे. गंगाखेड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करण्यात येत आहे. गंगाखेड शहरात वाहतुकीची प्रचंड मोठी समस्या आहे. रेल्वे गेट मुळे गंगाखेड वासियांना तासन्तास उन्हामध्ये ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे गंगाखेड शहराला उड्डाणपुलाची आवश्यकता आहे आणि तो उड्डाणपूल मी करून घेणार आहे. मी आणि खासदार संजय जाधव हे राजकीय विरोधक असलो तरी विकास कामांमध्ये अडथळे आणणार नाहीत असे म्हणत खासदार संजय जाधव यांच्या समोरच गंगाखेड शहरातील उड्डाणपूल होणार असल्याची जाहीर घोषणा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे.