thane
ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात चोरी गेलेले ३५ अँड्रॉइड आणि आयफोन मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी शोधून काढले. ठाणे वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. पोलिसांच्या या कार्यप्रणालीचे सर्वत्र कौतुक होत आहे!






