खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरूवात झाली. नारळीपौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. यादृष्टीने मासेमारी बंदर गजबजू लागली होती. मात्र अचानक दक्षिण वारा सुरू झाल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोकणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे समुद्राला उधाण आले आहे. 23 ऑगस्ट पासून देवगड बंदरात गुजरात मंगलोर या ठिकाणाहून १६० पेक्षा जास्त मच्छीमार बोटी या आश्रयासाठी आल्या आहेत.