(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर अनेक अजब-गजब व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे लग्नसमारंभातील देखील अनेक सोहळे शेअर केले जातात. मात्र आता इथे एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्यांचा विचार तुम्ही कधी स्वप्नातही केला नसेल. लग्नसमारंभातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे मेहंदी फंक्शन. यात नवऱ्याचा नावाची मेहंदी नवरी आपल्या हातावर लावते. आताही मेहंदी सोहळ्याचाच एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात महिलेने आपल्या हातांवर मेहंदी तर लावली आहे पण लग्नाची नाही तर घटस्फोटाची… होय एका महिलेने चक्क आपल्या घटस्फोटानिमित्त एक आगळावेगळा मेहंदी सोहळा आयोजित केला ज्याचे दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत..
काय आहे व्हिडिओत?
एका महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या लग्नानंतरच्या मेहंदीपासून घटस्फोटानंतरच्या मेहंदीपर्यंतचा प्रवास दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये, महिलेने तिच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाचा आनंद अतिशय खास आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. घटस्फोटानंतर तिने तिच्या स्वातंत्र्याचा आणि नवीन आयुष्याची सुरुवात दर्शविताना मेहंदी सोहळ्याचे आयोजन केले. ही पद्धत केवळ वेगळी नव्हती तर अनेक लोकांसाठी प्रेरणा देखील बनली. मेहंदीचे डिझाईन्स तीन भागात विभागले गेले होते. पहिल्या भागात तो क्षण दाखवण्यात आला होता जेव्हा मुलाने मुलीला प्रपोज केले होते. दुसऱ्या भागात, लग्नानंतरच्या मारामारींचे एका स्केलद्वारे चित्रण करण्यात आले तर तिसऱ्या आणि शेवटच्या भागात, एक मोठे तुटलेले हृदय रेखाटून घटस्फोटाचे चित्रण करण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ @mehandibysandhyayadav नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘घटस्फोट मेहंदी’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जीवनाच्या लढाईतून जिवंत परतल्याबद्दल अभिनंदन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा हे काही नवीन पाहायला मिळाले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.