(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली ही घटना ग्रेटर नोएडातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक लाल रंगाची कार रस्त्यावरुन वेगाने जात असल्याचे दिसते. याचवेळी गाडीच्या बोनेटवर आपल्याला एक माणूस लटकल्याचेही स्पष्ट दिसून येते. हा माणूस दुसरा तिसरा कोण नसून ट्रॅफिक पोलिस असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसात तैनात असलेले कॉन्स्टेबल गुरमीत चौधरी हे पी-३ चौकात ड्युटीवर होते. त्यावेळी एक लाल रंगाची गाडी तिथे आली आणि कॉन्स्टेबलने ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला तेव्हा ड्रायव्हरने वेगाने आणि बेपरवाईने गाडी चालवली आणि पोलिसाला धडकण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत, आपला जीव वाचवण्यासाठी, कॉन्स्टेबल उडी मारून गाडीच्या बोनेटवर पडला. यानंतरही, कार चालकाने गाडी थांबवली नाही आणि सुमारे ५०० मीटर गाडी चालवत नेली. जेव्हा लोकांनी हे पाहिले आणि खूप आवाज केला तेव्हा त्याने गाडी थांबवली आणि तेव्हाच कॉन्स्टेबलचा जीव वाचला.पोलिस प्रवक्त्याने पुढे सांगितले की, कार नंबरच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. यासाठी पथके देखील तयार करण्यात आली आहेत.
Greater Noida: A car was seen dragging a traffic police officer on its bonnet today near AWHO Township.
Hoping the officer is safe and the accused is arrested. 🙏🏻 @noidapolice pic.twitter.com/YsIfYhlfWs — Greater Noida West (@GreaterNoidaW) January 28, 2026
25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @GreaterNoidaW नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की पोलिस अधिकारी सुरक्षित असेल आणि त्या व्यक्तीला अटक झाली असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गंभीर बाब, दोषीवर कारवाई झालीच पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय लोक आहेत ना नियम पाळत, ना लोकांचा आदर करत… त्यांना प्राण्यांच्या श्रेणीत टाकायला हवं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






