सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी लोकांना हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आला आहे. यात एक महिला खुल्या आकाशाखाली जमिनीवर चटई पसरून आपल्या झोपेची मजा घेताना दिसून येत आहे. मात्र तितक्यात तिच्या मागून एक विषारी साप गुपचूप तिथे येतो आणि महिलेच्या अंगावर बागडायला लागतो. विशेष म्हणजे, आपल्या शरीराभोवती एक साप गिरक्या घालत हे महिलेला समजतही नाही इतक्या गाढ झोपेत ती झोपलेली असते. यांनतर पुढे काय झाले ते आता तुम्हीच पहा.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडिओमध्ये एक महिला एका बंजार जागेत खुल्या आकाशाखाली एक चटई टाकून झोपल्याचे दिसून येते. यानंतर अचानक तिथे एक साप येतो आणि तिच्याभोवती गिरक्या घालू लागतो. साप महिलेला पाहताच तिच्या अंगावर चढतो, हे सर्व दृश्य फार भीतीदायक वाटतात मात्र विशेष बाब म्हणजे, त्या महिलेला तिच्या जवळ साप असल्याची जाणीवही नाही.
हेदेखील वाचा – धक्कादायक! भररस्त्यात धावत्या रिक्षाला लागली आग, थरकाप उडवणारी दृश्ये अन् संभाजीनगरचा Video Viral
व्हिडिओतील दृश्ये पाहून असे वाटते की, महिला गाढ झोपेत आहे आणि साप महिलेच्या जवळ जाऊन तिच्या कपड्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. हा सीन फिल्मी सीनपेक्षा कमी नाही. ती महिला आता उठून काही प्रतिक्रिया देईल, असे व्हिडिओ पाहताना वाटत राहते. पण असे काहीच होत नाही. कारण साप आपल्या जवळ आल्याचे त्या महिलेला अजिबात कळत नाही मात्र, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे साप महिलेला कोणतीही इजा न करता तेथून निघून देखील जातो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @india.yatra नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 6 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ओएमजी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा धामण साप आहे, त्याच्या आत कोणतेही विष नाही, याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक म्हणतात, यामुळे मानवाला कोणताही धोका नाही.”
हेदेखील वाचा – बापरे! तरुणाने महाकाय कोब्राचे घेतले चुंबन तेवढ्यात सापाने काढला फणा अन् क्षणार्धात… थरकाप उडवणारा Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.