सोशल मीडियावर बरेच व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात अनेकदा काही प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओ डेझील सामील असतात. प्राण्यांना शिकार करताना फार लोकांनी कधी पाहिले नाही ज्यामुळे जेव्हा असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात तेव्हा ते फार कमी वेळेत व्हायरल होतात. लोक अशा व्हिडिओजना मोठी पसंती दर्शवतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक सरडा चक्क विषारी सापाची शिकार करताना दिसून येत आहे.
सध्या शिकारीचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मोठा मॉनिटर सरडा तोंडात साप धरताना दिसून आला आहे. हे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत, कारण साप पकडणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून सरडा आहे. पण व्हिडिओ जसजसा संपतो तसतसा या संघर्षात सरड्याची प्रकृती बिघडते आणि त्याला शेपूट दाबून पळून जावे लागते. व्हिडिओतील दोन प्राण्यांमधील हा थरार पाहणे फार मजेदार आहे. व्हिडिओचा जसजसा शेवट होतो तसतशी याची रंजकता आणखीन वाढत जाते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हिडिओच्या सुरुवातीला एक मोठा सरडा तोंडात साप घेऊन दिसत आहे. हा साप, एक धोकादायक कोब्रा कुटुंबातील असू शकतो, आपला जीव वाचवण्यासाठी सरड्यापासून पळून जाण्याचा तो प्रयत्न करतो. या दृश्यात सरडा आपली पकड मजबूत करून सापावर सहज नियंत्रण ठेवत आहे. मात्र, या धडपडीत त्याला आपली ताकद लक्षात येत नाही की, त्याहून अधिक घातक फणा सापाकडे असू शकतो.
त्याच्या या संघर्षमय लढतीत एक व्यक्ती तिथे येतो आणि तोंडात साप असलेल्या सरड्याला पकडून जमिनीवर ठेवतो. यानंतर सापाला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली. सापाने सरड्याच्या पाठीवर फणा पसरवला आणि सरड्याला चावा घेताच समजले की सरड्यापेक्षा सापाची हिंमत जास्त आहे. यानंतर सरडा घाबरून पळून जातो आणि सापही त्याला सोडून आपल्या वाटेला जातो. हा क्षण व्हिडिओच्या शेवटी दाखवला आहे, जिथे सरडा आपले नुकसान समजून माघार घेतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हायरल व्हिडिओ @murliwalehausla24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला इंस्टाग्रामवर एका दिवसात 17 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 31 हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स करत या लढतीवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काळालाही स्वतःच्या काळापासून घाबरताना दिसले, हे एक भीतीदायक दृश्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप धोकादायक”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






