या जगात स्वर्ग आणि नरक दोन्ही आहेत हे तुम्ही अनेकदा धार्मिक गुरू आणि ज्येष्ठांकडून ऐकले असेल. जो चांगला कर्म करतो तो स्वर्गात जातो आणि जो वाईट कर्म करतो तो नरकात जातो ते म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, नरकाचा दरवाजा या पृथ्वीवरच अस्तित्वात आहे? कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे! पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे वर्षानुवर्षे सतत जळत असलेले मोठमोठे खड्डे आहेत, त्यांना ‘द गेट्स ऑफ हेल’ असे म्हटले जाते.
नरकाचा हा दरवाजा तुर्कमेनिस्तानमध्ये (Turkmenistan Giant Holes of Fire) आहे जे प्रत्यक्षात मोठे खड्डा आहे. हे 230 फूट रुंद खड्डे गेल्या 50 वर्षांपासून सतत आगीने जळत आहेत. हे इतके मोठे आहेत की त्यांच्यामध्ये मोठी लोकसंख्या बसू शकते. खड्ड्यातून बाहेर पडणारे विषारी वायू हळूहळू शेजारी राहणाऱ्या लोकांचा जीव घेत आहेत. यामुळे त्यांची तब्येत खराब होत आहे. अश्गाबत शहरापासून सुमारे 160 मैलांवर असलेल्या काराकुम वाळवंटात हे मोठे विवर आहे. अग्नी सतत जळत असल्यामुळे याला ‘माउथ ऑफ हेल’ (Mouth of Hell) किंवा ‘गेट ऑफ हेल’ (Gate of Hell) असेही म्हणतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या वर्षाच्या सुरुवातीला तुर्कमेनिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बर्दिमुहामेदोव्ह यांनी हे खड्डे झाकून ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली. त्यांनी यासाठी आदेश दिले आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांना जगातील सर्वात मोठे तज्ञ शोधण्यास सांगितले आहे जे हा खड्डा बंद करण्यास सक्षम आहेत. आग विझवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण लोंकांना यात अपयश आले. याचा एक व्हिडिओ @WONDERWORLD23 नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
खड्यात आग कशी लागली?
हा विशाल खड्डा येथे नेहमीच उपस्थित नव्हते. दुस-या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनची परिस्थिती चांगली नव्हती असे मानले जाते. त्यांना तेल आणि नैसर्गिक वायूची नितांत गरज होती. त्यावेळी शास्त्रज्ञांनी वाळवंटात खोदकाम करून तेलाचा शोध सुरू केला. त्यांना नैसर्गिक वायू सापडला, पण जिथे त्यांना तो सापडला, तिथे जमिनीत गुरफटले होते आणि त्याजागी एक मोठा खड्डा तयार झाला होता. खड्ड्यांतून मिथेन वायूचीही झपाट्याने गळती झाली. वातावरणाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी खड्ड्यात आग लावली. गॅस संपला की आगही विझेल असे त्यांना वाटले, पण तसे झाले नाही आणि 50 वर्षांनंतरही गॅस सतत जळत आहे. मात्र, या दाव्याच्या सत्यतेचा कोणताही ठोस पुरावा नाही!






