Pic credit : social media
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दररोज आपल्याला नवनवीन आणि निरनिराळे व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. आणि लोक तर कोणाचा अपघात जरी झाला तरी त्याला वाचवण्याधी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यातच व्यस्त असतात. वाहन चालवताना खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुम्ही सुरक्षित तर राहालच, पण रस्त्यावरून चालणाऱ्यांनाही सुरक्षित वाटेल. यासाठी वाहतूक पोलिसही जनजागृती मोहीम राबवतात. असे असूनही अनेक लोक दारूच्या नशेत वाहन चालवतात तर अनेकजण वाहन चालवताना जीवघेणे स्टंट करतात.
रस्ता सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवणारे अनेक जण आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई केली जाते पण तरीही लोक या रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना रस्त्यावर जास्त वेगाने चालणे आवडते. अशा परिस्थितीत काही वेळा वेग इतका वाढतो की वाहन अनियंत्रित होते आणि मोठा अपघात होतो. एका कार अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात भरधाव वेगात असलेली अनियंत्रित कार एका रेस्टॉरंटचा दरवाजा तोडून आत घुसली. आणि या व्हिडिओमध्ये पुढे काय दाखवले आहे ते एकदा पहाच.
यूपी के आगरा स्थित एक होटल में देर रात अचानक बेकाबू हुई एक कार सीढ़ियों पर चढ़ते हुए हल्दीराम रेस्टोरेंट के गेट से जा टकराई एयर बैग की वजह से कार चला रहे शख्स की जान बच गई #UttarPradesh #Agra pic.twitter.com/CgtNpfd8Na
— Kartik Srivastava (@kartiksri331) September 10, 2024
भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटले
नुकताच या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वेगात असलेली कार नियंत्रणाबाहेर जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये घुसली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भरधाव वेगात असलेली कार रस्त्यापासून खूप उंचीवर असलेल्या रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढून रेस्टॉरंटचा दरवाजा तोडून आत शिरली.
या घटनेचा व्हिडिओ X या सोशल साईटवर कार्तिक श्रीवास्तव नावाच्या युजरने शेअर केला आहे युजरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले – यूपीच्या आग्रा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा एक कार पायऱ्या चढत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि हल्दीराम रेस्टॉरंटच्या गेटवर आदळली. एअर बॅगमुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला.
तासनतास गाडी अडकली
व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे समजते की, या अपघातात रेस्टॉरंट मालकाचे मोठे नुकसान झाले असावे. अपघातस्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कार चालक मद्यधुंद होता आणि त्यामुळे चालकाचा तोल गेला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कार रेस्टॉरंटच्या गेटवर आदळताच ती लगेच थांबली. त्यामुळे गाडी पुढे-मागे जाऊ शकली नाही आणि तासन्तास तिथेच अडकून पडली.