'त्या' रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की...; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक मजेशीर आणि भयावह व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे आपल्याला अनेक चोरीच्या, खूनाच्या, अपघाताच्या तसेच पोलिस रेडच्या सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या लखनऊ-बरौनी एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या लखनऊ-बरौनी एक्सप्रेसमध्ये असे काहीतरी धक्कादायक घडले आहे की, प्रवाशांसह पोलिस देखील चक्रावून गेले आहे.
लखनऊ-बरौनी एक्सप्रेसच्या AC डक्टचा असा वापर करण्यात आला आहे की पाहून तुम्हालाही धक्का बसले. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-बरौनी एक्सप्रेसमध्ये गुरुवारी (१४ ऑगस्ट) रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. ट्रेनचा एसी नीट काम करत नसल्याने प्रवाशांचे गरमीने हाल बेहाल झाले होते. एसीतून थंड हवा का येत नाही? अशा प्रश्नाने सर्व प्रवासी हैराण झाले होते. यामुळे प्रवाशांनी तक्रारही नोंदवली. पण त्यानंतर जे घडलं ते अगदी एखाद्या सिनेमासारखं.
लखनऊ-बरौनी एक्सप्रेसच्या एसी कोचमधील प्रवाशींनी तक्रार नोंदवल्यावर एक दारुच्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घडलं असे की, प्रवाशांची तक्रार मिळताच गाडी जंक्शनवर पोहोचल्यावर तपासणी सुरु झाली. टेक्निशियनने एसी डक्ट उघडा आणि त्यानंतर भयानक दुर्गंध संपूर्ण कोचमध्ये पसरली. लोकांना सुरुवातीला कोणाचीतरी बॅग फाटलेली असावी असे वाटले.
Passengers complained of low cooling in the AC coach of Lucknow-Barauni Express. When the technicians inspected the AC duct, consignment of a illict liquor was being hidden there.
कितने तेजस्वी लोग हैं हमारे यहाँ
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) August 14, 2025
पण त्यानंतर डक्टमधून मोठ मोठे पॅकेट्स बाहेर निघाले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय पॅकेट उघडून पाहिल्यावर तर पोलिसही चक्रावून गेले. या पॅकेट्समध्ये मिनी दारुच्या बाटल्यांचा स्टॉक पोलिसांना सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ५७ लीटर दारु पोलिसांना सापडली. या घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली असून याचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @JaipurDialogues या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत असून अनेकांना धक्का बसला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.