सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करतात. यात कधी काही जीवघेणे स्टंट्स दाखवले जातात, कधी थरारक अपघात तर कधी काही हास्यास्पद घटना. बऱ्याच काही धक्कादायक घटना देखील येथे शेअर होत असतात ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या अशीच एक थक्क करणारी घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आपल्याकडे आई-वडिलांनंतर शिक्षकाला फार महत्त्व आहे. आपलेउज्वल भविष्य घडवण्यात शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो. अशात त्याचा मान-सन्मान हा व्हायलाच हवा. मात्र सध्याच्या या व्हायरल व्हिडिओत काहीतरी भलतेच घडल्याचे दिसून येते. स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरामुळे अनेक तरुण याच्या अधीन झाले आहेत, अशात त्याच्याकडून हा फोन हिसकावून घेतला की ते सैर-बैर होतात. यातही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले.
एवढी थंडी की व्यक्ती थेट जळत्या लाकडावर जाऊन झोपला, पाहून तुम्हीही चक्रवाल, Video Viral
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील मोतीपूर पोलीस स्टेशन परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिहीनपुरवा शहरातील नवयुग इंटर कॉलेजच्या अकरावीच्या विद्यार्थ्याने मोबाईल हिसकावण्यासाठी शिक्षकावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजचे शिक्षक राजेंद्र वर्मा यांनी तीन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना मोबाईल आणण्यास मनाई केली होती. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन घेतले होते. गुरुवारी शिक्षक वर्गात हजेरी घेत असताना विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने मानेवर व चेहऱ्यावर वार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वी इयत्ता 11वीचे तीन विद्यार्थी वर्गात मोबाईल फोन वापरत होते. शिक्षक राजेंद्र वर्मा यांनी तीन विद्यार्थ्यांना मोबाईल वापरताना पाहिले होते. त्यानंतर शिक्षकाने त्याचा फोन जप्त केला. त्यानंतर शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाईल परत करण्यात आले. शिक्षकाने मोबाईल जप्त केल्यानंतर यातील एक विद्यार्थीने संतप्त होऊन शिक्षक राजेंद्र वर्मा यांच्यावर सूड उगवला.
#WATCH बहराइच में अटेंडेंस ले रहे शिक्षक पर छात्रों ने बोला हमला। सीसीटीवी में रिकॉर्ड हुई घटना। हैरान करने वाला है मामले का वीडियो।#Bahraich #BahraichTeacherAttacked #BahraichTeacher #UttarPradesh @NavbharatTimes pic.twitter.com/S0hJWCSIjq
— NBT Uttar Pradesh (@UPNBT) December 13, 2024
सदर घटना ही गुरुवारी घडून आली. या घटनेनंतर वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवत तिघांनाही पकडले आणि शिक्षकाचा जीव वाचवला. रक्तबंबाळ झालेल्या शिक्षकाला सीएचसीमध्ये नेण्यात आले. शिक्षकाची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि आता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.