लग्नसमारंभ आहे आणि त्यात बॉलिवूडची गाणी नाही असे होणे अशक्य आहे. रिसेप्शन असो वा वरमाला समारंभ, मागून गाण्यांचा आवाज येईपर्यंत लग्नाचा फील येत नाही.लग्नसमारंभात चित्रपटातील अनेक गोष्टी रिक्रिएट करून लग्नाची मजा आणखीन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये बॉलिवूडच्या गाण्यांसोबत एका बॉलीवूड चित्रपटानेही लग्नाच्या फंक्शनमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. लग्नातील हा सीन पाहून आता सोशल मीडिया युजर्स थक्क झाले आहेत. असे लग्न मुळातच तुम्ही कधी पाहिले असावे.
सोशल मीडियावर तुम्ही आजवर लग्नाचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील यात लग्नसमारंभातील अनेक मजेदार गोष्टी दाखवल्या जातात. मात्र सध्या लग्नातील जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो मुळातच तुम्ही कधी पाहिला नसावा. हे अनोखा व्हिडिओ आता अनेकांना थक्क करत आहे. लग्नात नवरा-नवरीची एंट्री फार महत्त्वाची असते, सर्व पाहुणे मंडळी त्यांचं एंट्री पाहण्यासाठी आतुर असतात. अशात लग्नावेळी ही खास एंट्री फार थाटामाटात घेतली जाते. कधी रथावर, कधी बाईकवर तर कधी आगळ्यावेगळ्या स्टाईलमध्ये ही एंट्री घेतली जाते. मात्र सध्या व्हायरल झालेली ही एंट्री अनेकांचे होश उडवून टाकत आहे.
काय आहे व्हिडिओत?
लग्नसमारंभ आता हळूहळू गाण्यांकडून फिल्मी स्टाइलकडे ट्रेंड करत आहे. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या लग्नात रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटाच्या स्टाईलमध्ये वधू-वरांनी लग्नसमारंभात घेतली एंट्री, ज्यानंतर लोकांनी खूप आश्चर्य व्यक्त केले आणि हे लग्न लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले. व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला यात दिसेल की, यात नवरा-नवरी चक्क ॲनिमल चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हॉर मशीनमध्ये बसून एंट्री घेतात. त्यांची ही एंट्री सर्वांचे डोळे खुलेच्या खुलेच ठेवते.
लग्नाला उपस्थित लोकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला, जो लगेच व्हायरल झाला. यूजर्स या कपलच्या क्रिएटिव्हिटी आणि फिल्मी स्टाइलचे कौतुक करत आहेत. तुमचा खास दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची आवड आणि फिल्मी टच उत्तम परिणाम देऊ शकतात हे या लग्नाने सिद्ध केले. हे लग्न केवळ कुटुंब आणि मित्रांसाठी खास नव्हते तर सोशल मीडियावरही या लग्नाची जोरदार प्रशंसा होत आहे.
लग्नातील अनोखा एंट्रीचा हा व्हिडिओ @saini5019 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ नवरा-नवरीची एंट्री’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला 4 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत. तसेच बऱ्याच युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या एंट्रीवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “काय कार्टून पंती करत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लग्नाचा ड्रेस कोड ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.