सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा लोकांना हसवतात, कधी भावुक करतात तर कधी थक्कही करून जातात. अनेकदा इथे काही अशा घटना शेअर केल्या जातात, ज्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही. सध्या अशीच एक अचंबीत करणारी घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, यातील दृश्ये पाहून तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. यात एक व्यक्ती चक्क जळत्या लाकडावर बसल्याचे दिसून येत आहे.
भारताच्या सर्व भागात थंडीने दार ठोठावले आहे. बर्फाळ वाऱ्यांचा हा मोसम टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जात आहेत. काहीजण थंड पाण्याचा वापर टाळत आहेत तर काही खोलीतील हीटर चालू करत आहेत. मात्र एका व्यक्तीने तर यात हद्दच पार केली आहे. वाढत्या थंडीच्या प्रभावामुळे एक व्यक्ती चक्क जळत्या लाकडावर जाऊन झोपला आहे. हे दृश्य फार थरारक आणि भीतीदायक आहे. मुख्य म्हणजे, यावेळी हा व्यक्ती एकदम निवांत होऊन या जळत्या लाकडावर बसल्याचे दिसून येत आहे. पण हीटर लावणेही एका व्यक्तीसाठी पुरेसे नव्हते, म्हणून त्याने काही लाकूड पेटवले आणि त्यावर झोपले. त्यानंतर या व्यक्तीचा सर्दीपासून सुटका करण्याचा मार्ग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती काही लाकडांच्या काड्या पेटवून त्यांच्यावर झोपला आहे. लाकडाच्या खाली पेटत असलेली ज्वलंत आग यावेळी ठळक दिसून येत आहे. यावेळी हा व्यक्ती आग लावलेल्या लाकडाच्या ढिगावर निवांतपणे झोपला आहे. हे दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. आगिच्या या ज्वलंत प्रकाशात आपल्या जीवाची पर्वा न करता हा व्यक्ती कसाकाय इथे झोपू शकतो असा प्रश्न सर्वांना पडला. धोक्याशी खेळत तो त्या ज्वलंत आगीच्या लाकडांवर आरामात पडून असतो. ज्वाळा थोड्याशा तेजस्वी झाल्या की, माणूस घाबरतो आणि जळत्या लाकडापासून उठून दूर होतो.
हा धक्कादायक व्हिडिओ @altu.faltu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हेच कारण आहे की महिला पुरुषांहून अधिक काळ जगतात’ असे लिहिण्यात आली आहे. व्हिडिओला 2 हजाराहून अधिक लोकांनी लाइक्सस दिले आहेत. तसेच अनेकांनी यावर देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वाटत आहे यमराज सुट्टीवर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माउंटन ड्युची पावर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.