फोटो सौजन्य: @CarWale/ X.com
भारतातील प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Mahindra & Mahindra कंपनीकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीची नवी एसयूव्ही Mahindra Vision S अलीकडेच टेस्टिंगदरम्यान दिसून आली आहे. टेस्टिंगच्या वेळी काही महत्त्वाची माहिती समोर आली असून, लाँचबाबतही अंदाज वर्तवले जात आहेत.
महिंद्राकडून लवकरच ‘व्हिजन एस’ ही नवी एसयूव्ही सादर करण्याची तयारी सुरू आहे. अधिकृत लाँचपूर्वी या मॉडेलची टेस्टिंग घेतली जात असून, अलीकडेच ती टेस्टिंगदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली.
355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…
टेस्टिंगदरम्यान ही एसयूव्ही पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही डिझाइनविषयी काही अंदाज लावता येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या एसयूव्हीचा डिझाइन महिंद्राच्या विद्यमान स्कॉर्पिओ-एनपासून प्रेरित असू शकतो. दमदार लूकसोबत आधुनिक फीचर्स देण्याची शक्यता आहे.
कंपनीकडून अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचे पर्याय दिले जाऊ शकतात.
1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सुमारे 131 हॉर्सपॉवर आणि 230 न्यूटन मीटर टॉर्क देऊ शकते. 1.5 लिटर डिझेल इंजिनमधून सुमारे 117 हॉर्सपॉवर आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
या एसयूव्हीत सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, ॲडजस्टेबल हेडरेस्ट, फोल्डिंग रिअर आर्मरेस्ट, एलईडी लाइट्स आणि रिअर डिफॉगर यांसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात.
सध्या या एसयूव्हीची टेस्टिंग सुरू आहे. कंपनीकडून अधिकृत लाँच डेट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार भारतात ही एसयूव्ही येत्या सणासुदीच्या काळात (फेस्टिव सीझनमध्ये) लाँच केली जाऊ शकते.






