Nikki Tamboli Became Vegan Says No Longer Tolerate The Sacrifice Of Goats
बिग बॉस मराठी ५ फेम निक्की तांबोळी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारा चेहरा… आपल्या निखळ सौंदर्याच्या माध्यमातून आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चर्चेत राहणाऱ्या निक्की तांबोळीने आपल्या हेल्थबद्दल महत्वाचा निर्णय घेतला आहे. अलिकडेच, बकरी ईदच्या निमित्ताने निक्की तांबोळीने इन्स्टाग्रामवर महत्वाची पोस्ट शेअर करत ती अधिकृतपणे व्हिगन (Vegan) अर्थात शुद्ध शाकाहरी झाल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अरबाज पटेलला डेट करत आहे. निक्कीने सांगितलंय की हा निर्णय तिने स्वतःसाठी घेतला आहे, याचा तिच्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही.
सयाजी शिंदे प्रेक्षकांना देणार मराठी भाषेचे धडे, कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसणार अभिनेता
निक्की तांबोळीने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं की, “गो व्हिगन, व्हिगन डाएट नाही, हा तुमच्या मनाने घेतलेला निर्णय आहे. कारण मला या जगात जो बदल पाहायचा आहे, त्याची स्वतःपासून सुरुवात आहे.”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं होतं. बऱ्याच काळापासून मी या निर्णयाचा विचार करत होते आणि शेवटी माझ्या अंतर मनाने मला हा निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. मला समजले आहे की, जगण्यासाठी कोणत्याही प्राण्याला मरण्याची गरज नाही, असं वृत्त नवभारत टाईम्सने दिलंय.
सरकारच्या लाडक्या योजनेवर आता चित्रपट येणार, मंत्री आशिष शेलार यांनी दिला क्लॅप
बकरी ईदच्या वेळी प्राण्यांची कुर्बानी दिली जाते, त्याचा उल्लेख करताना निक्की म्हणाली की, “मी ‘बकरी ईद’ सणाच्या विरोधात आहे, अल्लाहच्या नावावर लाखो बकऱ्यांचा बळी दिला जातो, हे मला मान्य नाही. आता मला हा विचारही सहन होत नाही,” असं निक्की म्हणाली. निक्की इथेच थांबली नाही, ती पुढे म्हणाली की, “बदलाची सुरुवात घरापासून सुरू होते आणि म्हणूनच यासाठी विश्वास दृढ करायचा होता. त्यासाठी मला स्वतःला आजच व्हिगन व्हायचं होतं. आता मला खूप शांत वाटतंय.” असं निक्की म्हणाली.
सुपरहिट ‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानमध्ये का प्रदर्शित झाला नाही? आमिर खाननेच सांगितले कारण
निक्कीचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल मुस्लीम आहे. त्यांच्या नात्यावर होणाऱ्या परिणामावरही अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. निक्की म्हणाली की, “माझं नातं किंवा माझी डेटिंग लाइफ मी काय खावं हे ठरवू शकत नाही. माझ्यासाठी, माझे व्यक्तिमत्व आणि स्वतःशी असलेलं माझं नातं ही प्रायोरिटी आहे आणि मी त्याबरोबर कोणत्याही प्रकारे तडजोड करू शकत नाही.”
मुलाखतीच्या शेवटी निक्की म्हणाली की, “धर्म आणि फूड चॉइस या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि लोकांनी या दोन्ही एकत्र करू नये. मी स्वतःच्या मनाचं ऐकणारी आहे, कायम अशीच असेन.”