आजकाल कधी, कुठे काय होईल ते सांगता येत नाही. दररोज अपघाताचे नवनवीन प्रकरण समोर येत असतात. यातून कोणी मृत्यूच्या काचाड्यात सापडत तर कोणी मृत्यूच्या दाढेतून बाहेर येत. सध्याचे अपघातांचे प्रमाण बघता घरातून बाहेर निघालेल्या व्यक्ती पुन्हा घरात सुखरूप येईल का याचीही शाश्वती नसते. सोशल मीडियावरही येत्या काळात अनेक भीषण घटनांचे व्हिडिओज व्हायरल होताना दिसून आले आहेत. सध्या अशाच एक भीषण अपघातचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक कर भरधाव वेगाने धावत डायरेक्ट घराची भिंत तोडून घरात घुसल्याचे दिसून येत आहे. यामुळे एक हसत खेळत कुटुंब बिखरल्याचे दृश्य निर्माण झाले. नक्की काय घडलं जाणून घेऊयात.
अंगावर काटा आणणारी ही घटना अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्समध्ये घडली आहे. यात घडले असे की, एक जोडपं आपल्या घरात जेवणाची तयारी करत होते. त्यावेळीच अचानक एक कर भरधाव वेगाने त्यांच्या घराजवळ येते आणि घराची भिंत तोंडात घरात घुसते. या घटनेमुळे आता घराचे तर नुकसान झालेच मात्र जोडप्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पाहून आता अनेकांना धडकी भरली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला, त्या वेळी या जोडप्याशिवाय त्यांचे तीन पाळीव श्वानही घरात उपस्थित होते. ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचे भयावह फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – “गॅस काय तुझा बाप देतो?” राइड कॅन्सल करताच रिक्षावाल्याला राग अनावर, तरुणीला कानशिलात लगावले, Video Viral
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये असे दिसून येते की, एक कार भिंत तोडून आत शिरली तेव्हा एक व्यक्ती टेबलावर जेवणासाठी सगळी तयारी करत होता. त्याने जेवणाची प्लेट आणून ठेवली होती, यानंतर काहीतरी आणून ठेवत असतानाच भरधाव वेगाने कार घरात घुसली, यावेळी तिथे तीन श्वानही खेळत होते. त्यांनाही या कारने उडवले, तर यात जोडपे गंभीर जखमी झाले. कारण कारच्या धडकेमुळे भिंताचा मलबा त्यांच्या अंगावर उडाला. सर्व काही इतक्या वेगाने घडले की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.
NEW: Suspected drunk driver plows his Ford Mustang into an Arizona couple’s living room as they were getting ready to eat dinner.
The incident happened in Phoenix, Arizona.
According to Sabrina Rivera, an 18-year-old was doing donuts in the street in front of their home when he… pic.twitter.com/OO2FZggA2S
— Collin Rugg (@CollinRugg) September 2, 2024
हेदेखील वाचा – Viral Video: श्वानाने हल्ला करताच सिंहाची हवा झाली टाईट, घाबरलेला सिंह पाहून नेटकरी झाले आवाक् म्हणाले…
या गंभीर घटनेचा व्हिडिओ @Collin Rugg नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “प्रत्येकजण त्यातून वाचला हा एक चमत्कार आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, ते अत्यंत भाग्यवान आहेत की यातून बचावले.