‘प्यार किया तो डरना क्या’ हा डायलॉग तुम्ही चित्रपटांमध्ये ऐकला असेल. प्रेम करताना जगाचा विचार करू नये असे म्हणतात. मात्र जसजसा वेळ पुढे जात आहे तसतश्या या प्रेमाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. लोक आजकाल उघडपणे आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करताना दिसून येतात. आताचे कपल्स ट्रेन, बस, गार्डन अशा सार्वजनिक ठिकाणी जगाची चिंता न करता आपले प्रेम व्यक्त करू लागतात.
प्रेम व्यक्त करणं काही चुकीचं नाही मात्र यावेळी आजूबाजूचं भान असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही याची देखील काळजी घ्यायला हवी. मात्र आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करू लागतात. याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कपल एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांना किस करताना दिसून येत आहे. मात्र किस करताना त्यांच्यासोबत जे घडते ते पाहून आता अनेकजण शॉक झाले आहेत.
हेदेखील वाचा – अतिशहाणपणा चांगलाच नडला! व्यक्ती किंग कोब्राला देत होता ठस्सन, तितक्यात सापाने फणा काढला अन्… Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक कपल एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांच्या समोर निवांत बसलेले दिसून येत आहेत. हे रेस्टॉरंट संपूर्ण रिकामे असून इथे फक्त हे दोघेच असल्याचे समजून येत आहे. इतक्यात समोर बसलेली तरुणी खुर्चीवरून अचानक उठते आणि तिच्यासमोर बसलेल्या तरुणाच्या मांडीवर जाऊन बसते. हा तरुण तिचा बॉयफ्रेड असावा. ती एवढ्यावरच थांबत नाही तर पुढच्याच क्षणी तरुणाला किस करण्याचा प्रयत्न करते. तरुण यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही आणि निस्तब्द होऊन बसून राहतो. आता दोघेही एकाच खुर्चीवर बसल्याकारणाने खुर्चीचा तोल ढासळतो आणि खुर्चीसकट दोघेही जमिनीवर आदळले जातात.
हेदेखील वाचा – पोलीस आहे म्हणत एकट्या तरुणीला करत होता ब्लॅकमेल, तरुणीने दाखवली हुशारी, केलं असं की… Video Viral
ही सर्व घटना रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण आता या व्हिडिओची मजा घेत यावर मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @marathiduniyaa नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “किती तेजस्वी लोक आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ““हॉटेल वाल्याने नंतर यांना मारलं असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “स्वतःचा अपमान करून घेतला”.