(फोटो सौजन्य: Twitter)
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सामोर आला आहे जो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक रशियन तरुणी रस्त्यावर गोंधळ घालताना दिसून आली. मद्यधुंद रशियन महिला एका इंडिगो कारमधून मित्रांसमवेत जात होती. यावेळीच अचानक ती बाजूला असलेल्या चालकाच्या मांडीवर जाऊन बसते ज्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटते आणि गाडी समोरून येणाऱ्या स्कुटरला जाऊन धडकते. हा अपघात इतका भीषण होता की यात तीनजण गंभीर जखमी होतात.
हे प्रकरण रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची ओळख पटलेली नसून तिघांनाही मेकहारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली आणि त्यानंतर तरुणीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ 5 फेब्रुवारी बुधवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये अपघातानंतर घटनास्थळी अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी रशियन तरुणीशी भांडण सुरू केले. यादरम्यान मुलगी सतत तिचा फोन मागत असते, मात्र तिचा फोन कोणाकडेच नसल्याचे तिला सांगण्यात आले. पोलीस तिला पोलीस स्टेशनला जाण्यास सांगतात पण ती वारंवार नकार देते आणि प्रकरण वाढतच जाते.
रशियन युवती का हाई वोल्टेज ड्रामा
रायपुर के वीआईपी रोड में जमकर मचाया हंगामा, पुलिस से भी की बहस, कार से युवकों को मारी टक्कर, 3 युवक अस्पताल में हैं भर्ती pic.twitter.com/sGXWQoE4iZ
— Nishant Tiwari (THE FREE VOICE) (@NishantTiwari_) February 6, 2025
माहितीनुसार, ही महिला पर्यटनासाठी रायपूरमध्ये आली असते. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. यासह त्यांच्या वाहनावर भारत सरकार अशी पाटी असल्याने गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी मागितली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @NishantTiwari_ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.