(फोटो सौजन्य: Pinterest)
जंगलाचे जग खूप सुंदर आहे आणि वेगळे असते. इथे अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा परिचय मानवाला झाला नाही. सोशल मीडियावरही जंगलातील अनेक दृश्यांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र सध्या इथे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याने अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले आहे. जंगलातील प्राणी तुम्ही अनेकदा प्रत्यक्षात अथवा टीव्ही किंवा कोणत्या व्हिडिओत पाहिले असतील मात्र आपण जे पाहतो जग तितकेच मर्यादित नसून त्याहूनही अधिक मोठे आहे आणि अशा अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण आजवर कधी पहिल्या नाहीत. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमचे होश उडवतील.
सध्या सोशल मीडियावर एका हरणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल की, हरणात एवढे विशेष काय तर यात आम्ही तुम्हाला सांगतो की, हा हरीण कोणता साधा सुधा हरीण नसून याचा रंग केशरी किंवा चॉकलेटी नसून पांढराभडक असल्याचे दिसून येत आहे. हरणाचे हे सुंदर आणि अनोखे रूप पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले आहेत. व्हिडिओत नक्की काय काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.
काल्पनिक नाही सत्य आहे…
सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ हरणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही काही सेकंदांसाठी थक्क व्हाल. वास्तविक, जंगलात एक अल्बिनो हिरण दिसले जे लोकांना खूप आकर्षित करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पहाल की सर्वत्र बर्फ कसा दिसतो आहे आणि या दरम्यान एक हरण देखील उभे आहे ज्याचा रंग पूर्णपणे पांढरा आहे. या हरणाला पाहून हा बर्फाचा जणू पुतळाच आहे असे वाटू लागते मात्र हे सत्य आहे. जंगलाचे हे दृश्य खरोखरच अद्वितीय आणि दुर्मिळ आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की हे अल्बिनो हरण आहे. अल्बिनो हरणांमध्ये मेलेनिन आढळत नाही, म्हणून ते पूर्णपणे पांढरे आहे आणि त्याचे डोळे गुलाबी आहेत. तसेच, अल्बिनो हरणांची दृष्टी खूपच कमकुवत असते, त्यामुळे ते सहजासहजी भयंकर प्राण्यांचे शिकार होतात.
A rare majestic white deer among the winter snow 🦌🌨️ Albino deers occur an average of 1 out of 30,000 births. pic.twitter.com/tix5doSivX
— AccuWeather (@accuweather) February 1, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @accuweather नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हिवाळ्यातील बर्फामधील एक दुर्मिळ भव्य पांढरे हरीण अल्बिनो हिरण 30,000 पैकी सरासरी 1 जन्म घेतात” असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी पाहिलेल्या सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती सुंदर रचना आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.