(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका मुलीची चांगलीच फजिती झालयाचे दिसून आले. विचार करा तुम्ही काहीही चूक केली नाही पण तरीही न केलेल्या कामाचं खापरं जर तुमच्यावर फुटत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? काही अशीच अवस्था सध्याच्या व्हायरल व्हिडिओमधील मुलीसोबत घडून आल्याचे दिसून आले. मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीवर कुठेतरी जाण्यासाठी निघाली होती आणि तितक्यात मागून दोन बैल तिला येऊन धडकतात. बरं बैलांच्या बाजूने विचार करायचा झाला तर मुलगी बैलांच्या भांडणाच्या आड आली… नाट्यमय वाटणाऱ्या या घटनेत अनेक मजेदार गोष्टी घडतात जे युजर्सना हसू अनावर करतात. चला व्हिडीओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
पांचट Jokes : बॉयफ्रेंड – तुम्ही मुली लव्ह मॅरेज का करता…? उत्तर ऐकाल तर हास्याला बळी पडाल
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दोन बैल आपआपसात भांडताना दिसून येतात. बैलांची संपूर्ण ताकद ही त्यांच्या शिंगांमध्ये असते अशात दोघेही आपल्या शिंगांनी शिंगे लावत जोरदार लढत देत असतात. असं करत असताना ते एक बैल दुसऱ्या बैलावर भारी पडतो ज्यामुळे बैल मागेमागे सरकत जातो आणि या अतितटीच्या लढाईत बैल मागेमागे जाताना अचानक मागील एका स्कुतीला धडकतात ज्यावर एक मुलगी बसलेली असते. बैलांची मुलीला इतक्या जोरात धडक बसतो की ती थेट स्कुटीवरूनच खाली पडते. यानंतर बैल आपली लढाई थांबवतात आणि गुपचूप तिथून आपला पळ काढतात. मुलीसोबत विनाकारण झालेली ही फजिती आणि त्यांनतर बैलांनी यावर दिलेली प्रतिक्रिया आता सर्वांनाच हसू अनावर करत आहे. मुलीसोबत जे काही घडलं ते वाईट असलं तरी युजर्सने मात्र या घटनेची चांगलीच मजा लुटली आहे.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @iamankit.____ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलीने भांडण थांबवले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बैल पण म्हणत असेल थांब जरा मुलगी खाली पडलीये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला खाली पडल्यानंतर त्यांच भांडण मिटलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.