(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर अनेक वेगेवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात, यातीलच काही व्हिडिओ हे व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा वन्य प्राण्याच्या जीवनाशी संबंधित देखील बरेच व्हिडिओज शेअर केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात गरुड आणि सिंहामध्ये जोरदार युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. हवेतील आणि जमिनीवरील या दोन धोकादायक शिकाऱ्यांमधील हे युद्ध आजतागात कोणी पहिले नसावे. ज्यामुळे याचा व्हिडिओ शेअर होताच तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
सिंह आणि गरुड यांच्यातील लढतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघे जंगलात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कधी सिंह गरुडावर मात करतो तर कधी गरुड सिंहाला गोंधळात टाकतो. हे दृश्य इतकं थक्क करणारं आहे की ते पाहून कुणीही थक्क होईल. सिंह आणि गरुड यांच्यातील चपळता आणि ताकदीची स्पर्धा व्हिडिओच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळते. हा मारामारीचा प्रकार जंगलात सर्रास पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता या युद्धात नक्की कोणी कुणावर विजय मिळवला ते जाणून घेऊयात.
कोण ठरलं विजयी?
तर युद्ध म्हटले की, विजय कुणाचा हा प्रश्न आलाच. या युद्धात व्हिडिओच्या शेवटी गरुड चक्क सिहाला हवेत झेपावताना दिसून येत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ इतका असामान्य आहे की तो खरा आहे की एआयने (AI) तयार केला आहे असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. व्हिडीओमध्ये सिंह आणि गरुडाची लढत इतकी खरी दिसते की, पाहणाऱ्यांना ही खरी घटना घडल्याचा भास होतो. पण अनेक तज्ञांचे मत आहे की ते AI ने तयार केले असावे. व्हिडिओचे व्हिज्युअल आणि दोन्ही प्राण्यांचे भाव इतके अचूक आणि नैसर्गिक दिसतात की प्रत्येकजण ते पाहून थक्क झाला. व्हिडीओच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी लोकांमध्ये या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
गरुड-सिंहाच्या अलौकिक युद्धाचा व्हिडिओ @wonderful_place12 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भूमीचा राजा विरुद्ध आकाशाचा राजा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.