अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! श्वानांच्या टोळीने बिबट्याला टाकले फाडून, शिकारीचा भयानक थरार अन् Video Viral
तुम्ही आजवर सोशल मीडियावर प्राण्यांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील मात्र बिबट्या सारख्या धोकादायक आणि बलाढ्य प्राण्याची शिकार एका श्वानाने केल्याचे कधी पाहिले आहे का? ही घटना सत्यात घडली असून याचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. व्हिडिओतील दृश्ये फार आश्चर्यकारक असून आता लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. नक्की यात काय आणि कसे घडले ते जाणून घेऊयात.
बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज तुम्ही आजवर पाहिले असतील. अशा घटनांचे अनेक व्हायरल व्हिडिओज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी कुत्र्यांना बिबट्याची शिकार करताना पाहिले आहे का? तुम्ही तो पाहिला नसेल तर हा व्हायरल व्हिडिओ तुमचे मन हेलावून टाकणार आहे. कारण या यामध्ये कुत्र्यांची एक पलटण बिबट्याला वाईटरित्या ओरबाडताना आणि शिकार करताना दिसत आहे. बिबट्या स्वत:ला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो मात्र याचा काहीच उपयोग होत नाही. हा व्हिडिओ पाहून आता सोशल मीडिया युजर्स पब्लिक हैराण झाले आहेत.
रस्त्याच्या मधोमध साप-मुंगूस झाले युद्धात मग्न, पाहण्यासाठी डझनभर लोकांनी अडवला रस्ता पण शेवटी जे झालं… Video Viral
काय घडले व्हिडिओत?
हा व्हायरल व्हिडिओ अवघ्या 30 सेकंदांचा आहे ज्यामध्ये 5 कुत्र्यांच्या तुकडीने बिबट्याला पकडल्याचे आपण पाहू शकतो. तो त्याच वाईट रीतीने ओरबाडत आहे. काही कुत्र्यांनी बिबट्याला त्याच्या डोक्याजवळ पकडले आहे, तर काहींनी त्याचे पाय पकडले आहेत… हे सर्वजण जंगलातील भयानक शिकाऱ्याला (बिबट्याला) वाईटरित्या ओरबाडताना दिसत आहेत. हे दृश्य इतकं वेदनादायी आणि थरारक आहेत की पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. बिबट्याची अशी ही अवस्था आणि श्वानांची ही दहशत पाहून आता सर्वजण हादरले असून आता हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
— NATURE IS BRUTAL (@TheBrutalNature) August 27, 2024
श्वानांद्वारे केल्या गेलेल्या बिबट्याच्या या भयानक शिकारीचा व्हिडिओ @TheBrutalNature नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप चुकीचे आहे आणि व्यक्ती रेकॉर्ड करण्याशिवाय काहीच करत नाही? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नंतर ही लढत कशी संपली हे जाणून घेणे मनोरंजक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.