(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियाच्या दुनियेत अनेक अतरंगी आणि अनोखे व्हिडीओज नेहमीच व्हायरल होत असतात. तुम्ही इथे ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही असे ब्रेसिग व्हिडिओ आजवर पाहिले असतील. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील व्हिडिओ शेअर होतात जे पाहून आपण आवाक् होऊ. यातील दृश्ये नेहमीच आपल्याला थक्क करून जातात. अशातच आता इथे असाच आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात शिकारीचे एक अद्भुत आणि अनोखे दृश्य दिसून आले. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
इथे आड आणि तिथे विहीर ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल मात्र याचे जिवंत उदाहरण साध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की एका मोठ्या बेडकाने कोब्राला अर्धा गिळला आहे, पण गोष्ट इथेच संपत नाही. सामान्यत: बेडूक कोब्राचा शिकार होताना दिसतो, परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रकरण पूर्णपणे उलट आहे. आपली ताकद दाखवत बेडकाने कोब्रा अर्धा गिळला होता आणि सापाचे डोके बाहेर चिकटले होते. विशेष म्हणजे कोब्रा कसा तरी स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण बेडकाची पकड इतकी मजबूत होती की त्याला हलताही येत नाही.
हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच अचानक तिथे एक मांजर एंट्री घेते. बेडकाने अर्धा कोब्रा गिळल्याचे पाहतच ती थक्क होते कारण यावेळी कोब्रा जिवंत असून तिच्याकडे खुल्या डोळ्यांनी पाहत असतो. पुढे मांजर हळू हळू नागाच्या दिशेने जाऊ लागते. ती यावेळी कोब्राला हाथ लावण्याचाही प्रयत्न करते मात्र कोब्रा पुन्हा तिच्यावर हल्ला करत असल्याचे पाहून ती मागे होते. मांजरीची मात्र एंट्री पाहताच बेडूक घाबरतो आणि अर्धा कोब्रा तोंडात घेऊन स्तब्ध नजरेने तिच्याकडे पाहू लागतो. हे संपूर्ण दृश्य कोणत्या क्लायमॅक्सपेक्षा कमी वाटत नाही. व्हिडिओचा शेवट इथेच होत असला तरी हे दृश्य आता लोकांचे मनोरंजन करत आहे, लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत असून आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
A snake fights a cat while being eaten by a massive frog. pic.twitter.com/TDSvhBVYXb
— Creepy (@creepydotorg) October 26, 2024
शिकारीचा हा अनोखा थरार @creepydotorg नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘एक मोठा बेडूक खात असताना साप मांजरीशी लढतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे WWE वाटत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मांजर पाहूनच थक्क झाले आहे”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.