फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षाची सुरुवात शुभ योगाने झाली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये दोन प्रमुख ग्रहांची युती होईल. जानेवारी महिन्यात शुक्र आणि सूर्य मकर राशीत संक्रमण करणार आहे त्यामुळे शक्रादित्य राजयोग तयार होणार आहे जो ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जातो. सूर्य हा आत्मविश्वास आणि आदराचा कारक आहे, तर शुक्र हा आनंद, संपत्ती आणि आर्थिक समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. अशा वेळी या दोन ग्रहांच्या युतीमुळे तयार होणारा राजयोग काही राशींना सौभाग्य आणू शकतो आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदलदेखील आणू शकतो. शुक्रादित्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घेऊया.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खास असणार आहे. तुमच्या कामाच्या योजना योग्य दिशेने पुढे जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध निर्माण होतील, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन घर खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तूळ राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाला सोबत घेणे चांगले राहील. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. करिअरच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. यावेळी तुम्ही वाहनांची खरेदी करु शकता.
धनु राशीसाठी हा काळ शुभ आहे. तुमच्या कलात्मक कौशल्यांमध्ये सुधारणा होईल. तुमच्या प्रेम जीवनात एक नवीन सुरुवात किंवा वळण येऊ शकते. समाजात सहभाग घेतल्याने तुम्हाला आदर मिळेल. या काळात तुमच्या परदेश प्रवासांना गती मिळेल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असेल, परंतु परिस्थिती अनुकूल राहील. जमीन किंवा जमिनीच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करू शकता. या काळात चांदीच्या वस्तूंची खरेदी करु शकता.
मीन राशीच्या लोकांचा हा काळ नवीन बदलांनी भरलेला राहील. सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वाहनांची खरेदी करु शकता. नवीन कौशल्ये तुमचे उत्पन्न वाढवू शकतात. भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे भावनिक नाते अधिक घट्ट होईल. मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पासाठी मान्यता मिळेल. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल. नोकरी करणाऱ्या लोकांशी हा काळ सकारात्मक राहील. आर्थिक समस्या दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जेव्हा सूर्य आणि शुक्र ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा शुक्रादित्य योग तयार होतो. हा योग धन, वैभव, सौंदर्य, मान-सन्मान आणि करिअरमध्ये प्रगती देणारा मानला जातो.
Ans: जानेवारी महिन्यात सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे. हा काळ काही राशींसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो
Ans: नवीन व्यवसायाची सुरुवात, गुंतवणूक, विवाहविषयक निर्णय, सौंदर्य-सर्जनशील कामे आणि महत्त्वाचे करार या काळात शुभ मानले जातात.






