(फोटो सौजन्य: instagram)
सध्या ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट लोकांच्या मनात असा रुतून बसला आहे की आजही याचे सर्व शोज सर्वत्र हाऊसफुल आहेत. लोक वेळात वेळ काढून महाराजांचा इतिहास पाहायला थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. एवढेच काय तर अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाचे तब्बल 100 कोटींचा आकडा पार केला आहे. विकी कौशलने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून आता सोशल मीडियावर प्रेक्षकांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहे.
आताही इथे काही चिमुकल्या प्रेक्षकांचा व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. यात संपूर्ण थिएटरभर काही विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या जागेवर उभे असून छातीवर हात ठेवत शिवगर्जना करताना दिसून आली. हे रोमांचक दृश्य आता अनेकांच्या अंगावर काटा आणत असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. सदर व्हिडिओ हा तेलंगणातील असून चित्रपट पहिल्यांनंतर या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षणाचा ऊर अशाप्रकारे भरून येतो की थेट थिएटरमध्येच ते महाराजांचे स्मरण करून शिवगर्जना करू लागतात.’
शाळेच्या गणवेशात सर्व विद्यार्थी जिवाच्या आकांतातून शिवगर्जना करतात ते पाहून आता सोशल मीडिया युजर्स भावुक झाले आहेत. तसेच अनेकाजण शिक्षकांचा तसेच विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक करत आहेत, त्यांची प्रशंसा करत आहेत. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात चिमुकले उंच स्वरात शिवगर्जना करताना दिसतात.
ते म्हणतात, “आस्ते कदम… आस्ते कदम… आस्ते कदम…
महाराSSSSSSSSSज…
गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती…
सुवर्णरत्नश्रीपती…
अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित…
न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत…
राजनीतीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर…
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर…
महाराजाधिराज…
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…
जय भवानी जय शिवाजी..
हर हर महादेव…
चिमुकल्यांच्या शिवगर्जनेचा हा व्हायरल व्हिडिओ @madhu_patel_patriot नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरूनस शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कृपया शाळेचे नाव सांगा मी माझ्या मुलालाही या शाळेत टाकेन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तमाम तेलंगणातील हिंदूंना विनम्र अभिवादन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.