फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी लोक असे असे व्हिडिओ बनवतात पाहून हसू आवरता येत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की धक्का बसतो. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लोकांसाठी कला दाखवण्याचे माध्यम बनलेले आहे. पण कधी कधी हे लोक असे हास्यास्पद करताता की रडावे की हसावे कळत नाही. सध्या असाच एक तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण तर झाले आहेतच पण अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. हा तरूण गिटार वाजवत गाणे म्हणत भाजी विकताना दिसत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच स्वीगीने देखील या तरूणाचे कौतुक केले आहे. गाणे गात भाजी विकणाऱ्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
गिटार वाजवत आणि गाणे म्हणत भाजी विकताना तरूण
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण गिटार घेऊन गाणे म्हणताना दिसत आहे. त्याच्या समोर भाजीचा एका गाडा आहे. त्या गाड्यावर भेंडी, वांग, भोपळा, टोमॅटो यांसरख्या अजून काही भाज्या आहेत. हा तरूण गिटार वाजवत भाजी विकण्याचे गाणे म्हणत आहे. तो म्हणत आहे की, माझ्याकडून भाज्या खरेदी करा, मग तो एक एक भाजी चे नाव घेतो. हे सगळे तो अगदी सुरात गात असतो. आणि त्यासोबतच तो गिटारही वाजवत असतो.
हे देखील वाचा- बैलाशी पंगा घेणे तरूणाला पडलं महागात; असा शिंगावर घेतला अन्…, पाहा व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @zurarahh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ तुझ्या व्हिडिओवर लाईक, कमेंट आणि शेअर पण केली मला भाजी स्वस्तात देशील ना, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याच्या गाडीवर उद्या पोरींची गर्दी असेल. यासोबतच स्विगी इंस्टामार्टनेही व्हिडिओवर कमेंट करून त्याचे कौतुक केले आहे. कमेंट करताना स्विगी इंस्टामार्टने लिहिले, सूर्या, तुझा आवाज अप्रतिम आहे.