Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…

वाराणसीमधील 'स्केलेटन हॉरर रेस्टॉरंट'मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक 'भूत' एका लहान मुलाला किंचाळण्याइतके घाबरवत आहे. इंटरनेटवर लोक रेस्टॉरंट आणि पालक दोघांवरही टीका करत आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 20, 2026 | 11:53 AM
वाराणसीचे भयानक रेस्टॉरंट व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)

वाराणसीचे भयानक रेस्टॉरंट व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • आई-वडिलांनी मुलाला नेले भुताच्या रेस्टॉरंटमध्ये 
  • मुलगा भीतीने झाला शॉक 
  • व्हायरल व्हिडिओने खळबळ 
वाराणसी तिच्या संस्कृतीसाठी ओळखली जाते, पण येथील एक ‘भुताटकीचे’ रेस्टॉरंट सध्या व्हायरल होत आहे. धर्माच्या या शहरात असलेले ‘स्केलेटन हॉरर रेस्टॉरंट’ आधीच त्याच्या अनोख्या थीममुळे चर्चेत होते, पण आता एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. एका निरागस मुलाचे भीतीने रडणे आणि वेटरचे भीतीदायक वागणे आता रेस्टॉरंटला महागात पडत आहे.

हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर पालकांनाही लोकांनी धारेवर धरले आहे. मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होत असेल याचा तरी किमान विचार करायला हवा असंच सांगण्यात येत आहे. 

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! हायवेवर स्टंटबाजी जीवावर बेतली; ओव्हरटेक करायला गेले अन्…, थरारक Video Viral

नेमके प्रकरण काय आहे?

वाराणसीच्या चेतगंज भागातील ‘स्केलेटन हॉरर रेस्टॉरंट’मध्ये वेटर भूत आणि सांगाड्यांचा वेष धारण करून जेवण वाढतात. अलीकडेच, रेस्टॉरंटच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक भीतीदायक वेटर एका लहान मुलाजवळ जाऊन त्याला घाबरवतो. ते मूल इतके घाबरते की हात जोडून ‘नाही, बाबा, बाबा, मला वाचवा!’ असे ओरडते. मुलाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत आहे, पण वेटर त्याला घाबरवणे थांबवत नाही. एकदा मूल घाबरल्यानंतर त्या वेटरने लांब जाणे अपेक्षित आहे. पण हा वेटर त्याला सतत त्रास देताना दिसून येत आहे. 

सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच वाऱ्यासारखा पसरला. आतापर्यंत ६ कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असले तरी, कमेंट्समधून लोकांचा संताप दिसून आला. मनोरंजनाच्या नावाखाली लहान मुलाचा मानसिक छळ करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे लोकांनी म्हटले. वापरकर्त्यांनी केवळ रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांवरच नव्हे, तर मुलाच्या पालकांवरही टीका केली.

एका वापरकर्त्याने लिहिले, “ते मूल खूप घाबरले आहे, तो कोणत्या परिस्थितीतून जात असेल हे कोणालाच माहीत नाही.” दुसऱ्याने म्हटले, “हे अजिबात गंमतीचे नाही; त्या मुलाला आयुष्यभर मानसिक आघात होऊ शकतो.” लहान मुलांना अशा ठिकाणी नेण्याची परवानगी का दिली जाते, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

रेस्टॉरंटचे वातावरण कसे आहे?

हे वाराणसीमधील पहिले हॉरर-थीम असलेले रेस्टॉरंट आहे. भिंतींवर सांगाडे टांगलेले आहेत आणि मंद प्रकाशात भीतीदायक संगीत वाजत असते. ग्राहकांना घाबरवण्यासाठी वेटर अचानक समोर येतात आणि त्यांना धक्का देतात. हे ठिकाण तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे, परंतु मुलांशी संबंधित अशा घटनांमुळे त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हायरल होण्यासाठी आणि जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी, रेस्टॉरंट्स काहीही करायला तयार असतात.

Web Title: Horror restaurant in varanasi child scared viral video kankal controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Social Media
  • Video Viral
  • viral video

संबंधित बातम्या

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
1

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 
2

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
3

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
4

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.