कारगिल विजय दिवसानिमित्त सोशल मीडियावर गोंडस व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल
भारत आज २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. याच दिवशी भारताला या युद्धात विजय मिळाला. कारगिल युद्धात शेकडो भारतीय सैनिकांनी आपले बलिदान दिले. पाकिस्तानातून भारतात आलेल्या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत आपल्या जवानांनी त्यांना हुसकावून लावले आणि १९९९ चे युद्ध जिंकले. या युद्धात अनेक भारतीय शूर सैनिकांनी आपले प्राणही गमावले. तेव्हापासून दरवर्षी २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
युद्धातील विजयी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. आज देश 25 वा कारगिल विजय दिवस आपण साजरा करत आहोत. सध्या सोशल मीडियावर याच संबंधी एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण आज व्हायरल होणारा हा खूप सुंदर व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही सैनिक त्यांच्या वाहनाजवळ उभे राहून लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक लहान मूल त्यांच्याकडे चालत येते आणि त्यांना तिरंगा ध्वज देते. सैनिक तो तिरंगा घेतात. तिथून परत जात असताना अचानकपणे मुल वळून सैनिकांना सलाम करते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सैनिकही त्याला सलामी देतात. सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. हा व्हिडिओ जुना असून, कारगिल विजय दिवसानिमित्त तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
No fan of #IndainArmy will pass without liking this post. ❤
Jai Hind 🇮🇳#MumbaiRains #Budget2024 #viralvideo #KanganaRanaut #TaapseePannu #TamannaahBhatia #ShahRukhKhan #SalmanKhan #Israel #HistoricModi3 #Archery Parliament #TheGreatestOfAllTime CONGRATULATIONS SUNGHOON pic.twitter.com/uCoZhmxAc3
— Pallavi Sharma (@BhawaniPallavi) July 25, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BhawaniPallavi या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाईक करून शेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – ‘भारतीय सेना सर्वात बेस्ट आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘हे अगदी बरोबर आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले- ‘जय हिंद जय भारत.’ तर ‘याला म्हणतात संस्कार’ असेही एकाने म्हटले आहे.