(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे भूत प्रत्येकाच्या मनात भिरभिरत आहे. अनेकदा तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल की लोक विचित्र गोष्टी करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर असे व्हिडिओज तुम्ही नक्कीच कधी ना कधी पाहिले असतील. सध्या मात्र इथे एक थरारक घटना व्हायरला झाली आहे. व्हिडिओतील दृश्ये निश्चितच तुम्हाला थक्क करून सोडतील.
साप म्हटलं की, सर्वांना त्याचा विषारी गुणधर्म आठवू लागतो. साप हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जमिनीवर सरपटणारा हा प्राणी आपल्या एका दंशाने भल्यामोठ्या प्राण्यांना मृत्यूचा दारात पोहचवण्याची शक्ती ठेवतो. प्राणीच काय तर बऱ्याचदा सापाला बघून माणसंही आपली वाट बदलू पाहतात. अशा या सापाच्या नादीला कोणीही जाऊ पाहत आणि त्याच संपासंबंधीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात एक व्यक्ती सापांशी मस्ती करायला जाताना दिसून येतो. मात्र या जीवघेण्या प्राण्याशी मस्ती करण तरुणाला चांगलंच महागात पडत. साप त्याच्यासोबत असे काही करतो की आयुष्यभर तो आपली ही मस्ती विसरू शकणार नाही. नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
सापाचे नाव ऐकूनच आपल्यापैकी अनेकजण घाबरतात, पण या व्हिडिओमध्ये दाखवलेली व्यक्ती एक-दोन नव्हे तर सापांच्या समूहात उडी मारते. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती वेगाने धावत येतो आणि सापांमध्ये उडी मारतो. उडी मारण्यापूर्वी, कदाचित या व्यक्तीला पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. सापांच्या घोळक्यात उडी मारताच त्यातील एक साप पुढच्याच क्षणी व्यक्तीच्या डोळ्यांजवळ चावा घेतो. यानंतर व्यक्तीचे काय घडते ते व्हिडिओत दाखवण्यात आले नाही मात्र व्हिडिओतील दृश्ये आता लोकांना आश्चर्यचकित करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @ct_seeking1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो युजर्सने हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोक अशा गोष्टी करतात आणि मग सापांना आक्रमक म्हणतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तू अजून मेला नाहीस का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.