क्षणात संपूर्ण खेळ उलटला! नदीकाठी पाणी पिणाऱ्या जिराफावर सिंहाचा हल्ला; पण जे घडलं की जंगलाच्या राजा बघतच राहिला, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय घडलं?
व्हायरस होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका नदीकाठी एक जिराफ शांततेने पाणी पित आहे. आसपास एकही प्राणी नाही. पण याच वेळी अचानक एका बाजूने जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची एन्ट्री होते. सिंह वेगाने जिराफच्या दिशेने धावत येत असतो, याची चाहूल लागताच जिराफ जोरात पळत सुटतो. सिंह अगदी त्याच्या जवळ पोहोचेला असतो. त्याच्या पायाला पकडून चावा घेणार इतक्यात पळता पळता जिराफ आपल्या पायाने सिंहाच्या थोबाडावर लाथ मारतो आणि तिथून पळून जातो. यानंतर सिंह जागीच थांबून जिराफला जाताना बघत राहतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @natureismetal या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण यावरुन लक्षात येते की जंगलातील जीवन किती धोकादायक आणि अनिश्चित आहे. कुठूनही, कधीही कोणावरही संकट येऊ शकते. पण अशा परिस्थिती धैर्य न गमवता लढणे महत्वाचे असते. हेच मानवाच्या आयुष्यातही लागू होते.
पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






