कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं..., VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओत एक पोर्श कार रस्त्यावरुन जात आहे. याच वेळी गाडी अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. गाडीतून एक तरुण बाहेर येतो. याच कारच्या मागे एक रेंज रोव्हर कारही असते. रेंज रोव्हरमधून काही लोक सिमेंट आणि पाणी घेऊन उतरतात. यानंतर पोरशे मालक कारच्या बोनेटवर सिमेंट ओततो. त्यात खड्डा तयार करतो आणि पाणीू टाकतो. एवढ्या महागड्या कारवर सिमेटं टाकल्याचे पाहून लोकांनी तरुणाला वेडं म्हटले आहे. खड्डा पाण्याभरल्यानंतर तरुण कारच्या बोनटवरुन सिमेंट घेतो आणि रस्त्यावरील खड्डा बुजवतो. यानंतर कारवरची सिमेंटची लेअर सहजपणे काढून टाकतो. सिमेंट काढल्यानंतर कारचा मूळ लाल रंग जशाचा तसा असतो.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आखिल यादवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतपार्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावर कमेंट करताना नेटकऱ्यांनी याला प्रमोशनल, मार्केंटिग स्टंट म्हटलं आहे. अनेकांनी रस्त्यांवरील खड्ड्याच्या समस्येकडे लक्ष्य वेधण्याच्या आखिलच्या कल्पक पद्धतीचे लोकांनी कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






