आपली ही सृष्टी निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे, असे आपण अनेकदा ऐकले असेल. या जगात अनेक अशी ठिकाणे आहेत, ज्यांना पाहूनच आपल्याला तेथे जाण्याची इच्छा होऊ लागते. तुम्ही पृथ्वीवरील अनेक निसरसौंदर्यमय ठिकाणे पाहिली असतील. मात्र याच पृथ्वीवर असेही काही ठिकाणे आहेत, ज्यांना पाहून आपल्याला ते ठिकाण खरे नसून काल्पनिक असावे असे वाटू लागते. या ठिकाणी आल्यावर आपण दुसऱ्याच जगात आलो आहोत, असे आपल्याला वाटू लागते. यातील काही ठिकाणे नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित आहेत मात्र महत्त्वाचे काय तर ही ठिकाणे खऱ्या आयुष्यात अस्तित्वात आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या ठिकाणाचे सौंदर्यही असेच आहे. हे ठिकाण पाहून तुम्हाला, हे खरे नसून काल्पनिक आहे असे वाटू लागेल.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही ठिकाणांचे अद्भुत दृश्य दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये पृथ्वीवरील अशी ठिकाणे दाखवण्यात आली आहेत, जी वास्तवाच्या पलीकडची वाटतात. त्यात तलाव, मानवनिर्मित गाड्या, इमारती, पुतळे, पर्वत, सुंदर शहरे इत्यादींचा समावेश आहे. ही ठिकाणे नक्की कोणती आहेत, चला जाणून घेऊयात.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @sarahleatravelandtours या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 2024 मधील पृथ्वीवरील सर्वात अवास्तवीक वाटणारी ठिकाणे, असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी कमेंट करून यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, मला या सर्व जागांना भेट देता यावी, अशी माझी इच्छा आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, जर माझ्याकडे वेळ आणि पैसे दोन्ही असेल तर मी या सर्व ठिकाणांना नक्की भेट देईल.