(फोटो सौजन्य – Instagram)
काय आहे प्रकरण?
व्हायरल व्हिडिओ एका पुरुषाच्या अनोख्या मागणीविषयी आहे ज्याने पोलिसांनी पत्नीचा हरवलेला पायजमा शोधण्यासाठी काॅल करुन बोलावून घेतले. पुरूषाच्या तक्रारीनंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले पण जेव्हा त्यांना समजलं की एका पायजमासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे तेव्हा हे ऐकूण क्षणभरासाठी थक्क झाले. विशेष म्हणजे, व्यक्तीला ओरडण्याऐवजी पोलिसांनी समजूतदारपणे परिस्थिती हाताळी आणि हरवलेल्या पायजम्याविषयी पूर्ण चाैकशी केली.
व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी व्यक्तीला काॅल करण्याचे मूळ कारण विचारतो ज्यावर पती पत्नीकडे निशाणा साधत तिचा पायजमा हरवल्याचे स्पष्ट करतो. तो सांगतो की, हरवलेला तो पायजमा आता त्याला परत मिळाला आहे, ज्यानंतर खात्री करुन घेण्यासाठी पोलिस व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला तो पायजमा दाखवण्यास सांगतात. घटनेची संपूर्ण चाैकशी केल्यानंतर आणि हरवलेला पायजमा पाहिल्यानंतर पोलिस तिथून निघून जातात आणि अखेर हे पायजमा प्रकरण तिथेच मिटते. चाैकशीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील व्यक्ती आणि पोलिसांचे संभाषण ऐकूण अनेकांना हसू अनावर झालं.
घटनेचा व्हिडिओ @mr.mintu_roy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ कट झाल्यानंतर, पोलिसांनी त्याला चांगलीच सेवा दिली असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे माझी पण शाल नाही सापडत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बायको असावी तर अशी तिने स्वतःच नाव पण नाय सांगितलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






